शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
2
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
3
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
4
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
5
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
6
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
7
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
8
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
9
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
10
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
11
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
12
मिशन 2025! बिहार काबीज करण्यासाठी सीएम नितीश कुमारांनी आखली खास योजना
13
शेअर बाजाराच्या नावावर हायप्रोफाईल फसवणूक! गृहमंत्रालयापर्यंत पोहोचलं प्रकरण, साडेसात कोटींचा गंडा
14
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
15
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
16
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
17
माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली
18
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
19
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
20
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक

इंझोरीच्या विद्यार्थ्यांनी घेतला ग्रामजागराचा वसा !

By admin | Published: August 11, 2014 11:29 PM

राष्ट्रसंतांनी घेतले होते तिन दिवस संमेलन : ७0 विद्यार्थ्यांचा सहभाग

वाशिम: जिल्ह्यातील मानोरा तालूक्याच्या कुशित वसलेल्या जवळपास ३६00 लोकसंख्येच्या इंझोरी गावातील ६0 ते ७0 विद्यार्थी गत १0 वर्षापासून राष्ट्रसंतांनी ग्रामगितेच्या माध्यमातून दाखविलेल्या ध्यान व प्रार्थनेचे नित्यनेमाने पठण करुन गावकर्‍यांमध्ये राष्ट्रभावना जागृतीचे काम करीत आहेत. जगत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी याच इंझोरी गावात २0 ते २२ फेब्रुवारी १९४८ रोजी तीन दिवसाचे ग्राम प्रबोधन संमेलन घेतले होते हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श जपण्याचे काम आजही इंझोरीतील सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंद्याने सहभागी करतात. इंझोरी गावातच उभारण्यात आलेल्या सामुदायीक प्रार्थना मंदिरात १0 वर्षापुर्वी गुरुदेव प्रार्थना व ध्यानसाधनेचा विषय सुरु झाला. ही ध्यानसाधना व राष्ट्रसंतांचे ग्रामविकासक विचार भावी पिढीच्या ध्यानीमनी रुजविण्यासाठी विद्यार्थीवर्गाने यात सहभागी होण्याचा विषय ग्रामपातळीवर पुढे आला. त्यातूनच गावातील जवळपास ६0 ते ७0 विद्यार्थ्यांनी त्यावेळी पुढाकार घेतला अन् एक परंपरा सुरु झाली. ती परंपरा आजतागायत सुरु आहे. ६0 ते ७0 विद्यार्थी दरदिवशी या प्रार्थना व ध्यानसाधनेत सहभागी होत असल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे तालुका सेवाधिकारी अरुण पाटील यांनी दिली. मानोरा तालूक्यातील गावागावात आजतागायत ग्रामगिता पठण वा प्रार्थनेचे काम केले जात नव्हते. परंतू या श्रावण महिण्यात मानोरा तालूक्यातील २१ गावात ग्रामगिता ग्रंथवाचन सुरु आहे. तालुक्यातील १९ गावातील घरभिंतीच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम केले जाणार असून यापैकी ११ गावात भिंतीवरील सुविचार, उपदेशपर संदेशाचे काम पूर्णत्वास आल्याची माहिती अखील भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक साहेबराव पाटील यांनी दिली.