चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 07:30 PM2020-09-06T19:30:19+5:302020-09-06T19:30:54+5:30
६ सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सण-उत्सवाच्या पृष्ठभूमीवर ठाणेदार गणेश वनारे हे परिसरात रात्रंदिवस गस्त करीत होते. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांनी आरोग्य तपासणी केली असता, आरोग्य विभागाने त्यांना होम क्वारंटीनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. ६ सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. तसेच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत चार ते पाच कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. चान्नी पोलीस स्टेशनमध्ये ३५ ते ४0 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी ठाणेदार यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनीही तपासणी करण्याची गरज आहे. यासोबतच ठाणेदारांच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)