इन्स्पायर अवार्ड मुलांच्या ज्ञानास चालना देणारे माध्यम - डॉ. रवींद्र भास्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 07:38 PM2020-09-26T19:38:52+5:302020-09-26T19:39:25+5:30
शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांच्याशी साधलेला संवाद...
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : २00९ पासून भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान इन्स्पायर अवार्ड योजनेची सुरुवात केली. आता इन्स्पायर अवार्डचे आयोजन राष्ट्रीय नवप्रवर्तन व भारत सहकार्याने केले जात आहे. हा स्टार्टअप इंडियाच्या प्रसारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, असे येथील शिक्षण तज्ज्ञ व इन्स्पायर अवार्ड अकोला जिल्ह्याचे संयोजक प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी सांगितले. त्यांच्याशी शनिवारी साधलेला संवाद...
मुलांना सर्वोत्तम बनविण्यासाठी का प्रोत्साहित करावे?
सृजनशील, कल्पनाशील मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. संवेदना, सृजनशीलता व सहकार्य ही भावना मुलांना योग्य नागरिक बनवतात; परंतु सर्वच मुलांची क्षमता वेगवेगळी असते. मुलांना सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्हाला जोर द्यावा लागेल. भविष्यात त्यांचा हाच गुण समाजासाठी उपयुक्त ठरेल. नवाचाराच्या ऊर्जेने देशासाठी रचनात्मक व समावेशक कार्य करू शकतील. त्यासाठी इन्स्पायर अवार्ड मानक भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे संचालित एक विशिष्ट कार्यक्रम आहे. याचा मुख्य उद्देश वर्ग सहावी ते दहावीमधील प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आहे.
इन्स्पायर अवार्ड अंतर्गत अर्ज कसे आमंत्रित केले जातात?
इन्स्पायर अवार्र्डस् मानकाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम विचार समाजाच्या दैनंदिन समस्यांचे समाधान करू शकेल. या व्यतिरिक्त घरगुती आणि श्रमिकांचे श्रम कमी करण्याचे उपाय ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासोबतच सेवासुद्धा सहज मिळतील.
योजनेचे कार्यान्वयन कशाप्रकारे केले जाईल?
मुख्याध्यापकांद्वारे शाळेमध्ये आयडिया स्पर्धेअंतर्गत विद्यार्र्थ्याचे दोन ते तीन सर्वोत्तम विचार निवडले जातील. ज्यांचे नामांकन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग भारत सरकारच्या वेबपोर्टल (ई-मॅनेजमेंट आॅफ इन्स्पायर अवार्ड स्कीम) वर केले जाईल. नवीन विद्यालय वेबपोर्टल ई-मिलासवर नोंदणी करून शकतात. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान व भारत सरकारतर्फे १ लाख विचारांना निवडले जातील. सर्व विद्यार्थ्यांना १0 हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. दहा प्रकल्पांच्या राज्यस्तरीय प्रदर्शनातून १ हजार प्रकल्पांची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात येईल. यातून ६0 सर्वोत्तम प्रतिकृती राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवडल्या जातील.
कल्पनेची स्पर्धा काय आहे?
कल्पनेच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकद्वारा सर्व शालेय मुलांना एकत्र करून त्यांना विचार, नवाचार, जसे की मशीन किंवा गॅझेट जे उपलब्ध नाही; परंतु एखादी मशीन बनवायची जिद्द आहे. कोणत्याही वर्तमान/उपलब्ध असलेल्या यंत्र किंवा गॅझेटमध्ये सुधाराची आवश्यकता आहे. यासाठी शाळेत आयडिया स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रोत्साहन द्यावे.