व्यापारी युनियनच्या वतीने संतोष झुनझुनवाला यांच्यासह व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात, अकोट शहरातील व्यापाऱ्यांना शासनाने ६ एप्रिलपासुन सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. बँकेचे व्याज, विद्युत बिल, कर्मचाऱ्याचे पगार व इतर सर्व खर्च सुरू असुन व्यापार बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सर्व व्यापारी व आमचे सर्व कर्मचारी यांच्या कोविड तपासणी सुध्दा झाली आहे. व्यापारी शासनाने ठरवलेल्या कोविडचे मार्गदर्शक तत्वे स्विकार करून व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी. अकोट नगर पालीकेचे कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी वारंवार अपमानास्पद वागणूक देत आहेत. शनिवार व रविवारी संपुर्ण लॉकडाऊनला विरोध नाही. परंतु सोमवार ते शुक्रवार पर्यंत सर्व प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते. दरम्यान दुकानात काम करणाऱ्या कामगारांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करावा अशी मागणी दुकान कामगार संघटनेने केली आहे.
फोटो: मेल फोटोत