आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 9:06 PM
आंतर विद्यापीठ महिला खो-खो स्पर्धा: मुंबई,पुणे संघाचे वर्चस्व कायम आहे.
नीलिमा शिंगणे-जगडअकोला: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला खो-खो स्पर्धेत शुक्रवारी सुपरलिग सामने खेळविण्यात आली. या सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने आपले वर्चस्व कायम राखले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर संघाला या सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले.शुक्रवारी चार सामने खेळविण्यात आले. पहिला सामना मुंबई विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघात झाला. मुंबईने हा सामना १ डाव १० गुणांनी जिंकला. मुंबईच्या श्रध्दा लाड हिने दमदार खेळी केली. २.१० सेंकद संरक्षण करीत तब्बल ४ गडी बाद केले. कार्तिका सोनवणे हिने २ मिनिट २० सेंकद संरक्षण करीत २ गडी बाद केले. रेश्मा राठोड हिने २.३० सेंकद संरक्षण करीत १ गडी बाद करण्यात यश मिळविले. अमरावती संघाकडून ऋतुजा गवरे हिने १.४० सेंकद पळतीचा खेळ केला. पायल जाधव हिने १ मिनिट संरक्षण करीत १ गडी बाद केला. हा सामना मुंबईने १८-८ गुणांनी जिंकला.दुसरा सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर संघात झाला. १ डाव ५ गुणांनी सामना पुणे संघाने विजय मिळविला. पुणे संघाची कोमल दारटकर हिने ४ मिनिट संरक्षण करीत कोल्हापुर संघावर दबाव निर्माण केला. प्रियंका इंगळे हिने २.४० सेंकद संरक्षण करीत २ गडी बाद केले. प्रतिक्षा खुरंगे हिने ३ मिनट संरक्षण करीत १ गडी बाद केला. कोल्हापुरच्या ऋतुजा खाडे हिने १.३० सेंकद संरक्षण केले. करिश्मा रिकीबदार हिने १ मिनिट संरक्षण करू न १ गडी बाद केला. पुणे विद्यापीठाने सामन्यावर १०-५ गुणांनी विजय मिळविला.तिसरा सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघात झाला. पुणे संघाने १४-८ ने सामना जिंकला. पुणे संघाच्या प्रियंका इंगळे हिने १.५० सेंकद संरक्षण करीत सर्वाधिक ६ गडी बाद केले. सपना जाधव हिने २ मिनिट संरक्षण करू न २ गडी बाद केले. प्रतिक्षा खुरंगे हिने २ मिनिट संरक्षण करू न २ गडी बाद केले. चवथ्या सामन्यात मुंबईने कोल्हापुरचा पराभव केला. तत्पूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंचा परिचय किर्ती विलास भाले यांनी करू न घेतला.