प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली. जिल्हा खनिकर्म अधिकारी आणि अकोल्याच्या तहसीलदारांनी भेट देऊन, गायरानातील माती उत्खननाची पाहणी केली.पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी शिलोडा-कानडी रस्त्यालगत गट नं. ३८ व ३९ मधील सरकारी जमिनीवर (गायरान) मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. पुणे येथील राइट इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीमार्फत गायरान जमिनीवरील मातीचे उत्खनन करण्यात येत असून, उत्खननाच्या निकषानुसार २0 फूट खोल मातीचे उत्खनन करण्याची र्मयादा असताना, ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार गायरानातील मातीच्या उत्खननाची चौकशी २८ नोव्हेंबरपासूनच सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे, मंडळ अधिकारी नीळकंठ नेमाडे यांनी शिलोडाजवळील गायरानात सुरू असलेल्या माती उत्खननाच्या ठिकाणी भेट देऊन, माती उत्खननाची पाहणी करून माहिती घेतली.
‘रॉयल्टी’ आणि माती उत्खननाचे ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे निर्देश!उत्खननापोटी आतापर्यंत ‘रॉयल्टी ’ रक्कमेचा केलेला भरणा आणि मातीचे करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात तीन दिवसात ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसीलदारांनी राइट इन्फ्रास्ट्रक्शन कं पनीच्या व्यवस्थापकांना दिले.
माती उत्खननाचे आजपासून मोजमाप!शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानातील मातीच्या अवास्तव उत्खननाची प्रशासनामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये २९ नोव्हेंबरपासून माती उत्खननाचे मोजमाप सुरू करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांच्या चमूकडून माती उत्खननाचे मोजमाप करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार शिलोडाजवळील गायरानातील माती उ त्खननाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. माती उत्खननासंदर्भात तीन दिवसात ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे निर्देश संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना देण्यात आले असून, माती उत्खननाचे मोजमाप बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे.- डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी