- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील दोन तालुक्यात खदानींच्या तपासणीत उत्खनन व विविध प्रकारची अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवत, खदानींचे तात्पुरते परवाने आणि नूतनीकरणासंदर्भात सुधारणा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाºयांना (एसडीओ) १ नोव्हेंबर रोजी दिला.अकोला तालुक्यातील येवता, बोरगावमंजू आणि बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा येथील खदानींची जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांच्यासह संबंधित अधिकाºयांनी गत ३० आॅक्टोबर रोजी तपासणी केली होती. खदानींच्या तपासणीत उत्खननासह विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या. त्यामुळे खदानींंमधून उत्खननाचे तात्पुरते परवाने देताना आणि नूतनीकरण करताना सुधारणा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिला आहे.तपासणीत आढळलेल्या अशा आहेत अनियमितता!-खदानींच्या उत्खननाची खोली ६ मीटरपेक्षा जास्त झालेली असतानाही तहसीलदार व उपविभागीय अधिकारी स्तरावरून तात्पुरता परवाना जारी करणे.-खनिपट्ट्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील नूतनीकरण न होताच खदानीच्या उत्खननाचा तात्पुरता परवाना जारी करणे.-तहसीलदार व उपविभागीय अधिकारी स्तरावरून खदानींची प्रत्यक्ष पाहणी न करणे.-खदानींना कुंपन नसणे, नामफलक नसणे, खनिपट्ट्यासंदर्भात कोणतीही माहिती दर्शनी भागात न लावणे, खदान परिसरात झाडे लावलेली नसणे.सुधारणा करण्याचा असा देण्यात आला आदेश!-तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांनी त्यांच्या अधिनस्त सर्व खदानींची संयुक्तरीत्या प्रत्यक्ष पाहणी होईपर्यंत कोणत्याही खदानीचा तात्पुरता परवाना जारी करण्यात येऊ नये.-सहा मीटरपेक्षा जास्त खोल उत्खनन झालेल्या खदानींचे तात्पुरते परवाने तत्काळ प्रभावाने कायम बंद करण्यात येत आहेत.-तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांनी निर्गमित केलेल्या खदानींच्या तात्पुरत्या परवान्यांची मागील एक वर्षाची माहिती जिल्हाधिकाºयांसमोर सादर करण्यात यावी.-खनिपट्ट्याचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील नूतनीकरण न केल्यास संंबंधित खदानींमधून तात्पुरता उत्खननाचा परवाना जारी करण्यात येऊ नये....तर खनिपट्टा बंद करणार!खदानधारकांनी खदानींना कुंपन घेणे, नामफलक लावणे, सभोवताली झाडे लावणे बंधनकारक आहे. या बाबी आढळून न आल्यास खदानधारकांचा संबंधित खनिपट्टा बंद करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांच्या आदेशात देण्यात आला आहे.