अकोला: शहरातील मुख्य रस्त्यालगतचे विद्युत खांब व रोहित्र हटवून भूमिगत केबल टाकण्यास महावितरणने नियुक्त केलेल्या अशोका बिल्डकॉन कंपनीने ऐनवेळेवर नकार दिला. या मुद्यावर महावितरण कंपनीच्या भूमिकेवर पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सिमेंट रस्त्यांच्या कामकाजाला अडथळा निर्माण होत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपाच्या स्तरावर विद्युत खांब हटविण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून सात सिमेंट रस्त्यांचे निर्माण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. आयुक्त अजय लहाने यांनी मनपाची सूत्रे स्वीकारताच रस्ते रुंदीकरणावर शिक्कामोर्तब केले. रस्ते रुंदीकरण करताना रस्त्याच्या मधोमध उभे असणारे विद्युत खांब व रोहित्र हटविण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, आयुक्त अजय लहाने यांनी महिनाभरा पूर्वी महावितरण कंपनीसोबत चर्चा केली. महावितरणचे अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे यांनी अशोका बिल्डकॉन कंपनीला विद्युत खांब हटवून भूमिगत केबल टाकण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान ह्यआरएडीपीह्णयोजनेंतर्गत बिल्डकॉनने लक्कडगंज रस्त्यावरील विद्युत खांब हटवून भूमिगत केबल टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मुख्य डाक घर ते सिव्हिल लाइन चौक, टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक व अशोक वाटिका ते सरकारी बगिचा या चार मार्गावरील विद्युत खांब हटविण्याची वेळ येताच, बिल्डकॉन कंपनीने ऐनवेळेवर (शनिवार १७ ऑक्टोबर) काम करण्यास नकार दिला. या मुद्यावर महावितरण व बिल्डकॉन कंपनीची भूमिका लक्षात घेता मनपा आयुक्त अजय लहाने यांनी मन पाच्या स्तरावर विद्युत खांब हटविण्याचा निर्णय शनिवारी रात्री घेतला. याकामासाठी देखरेख म्हणून महावितरण कंपनीची मदत घेतली जाईल. त्याबदल्यात कंपनीला पैसे अदा केले जातील.
विद्युत खांबांच्या मुद्यावर महावितरणचे हात वर
By admin | Published: October 19, 2015 1:46 AM