कापशी ग्रामपंचायत ठरली पहिली ओडीएफ प्लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:21+5:302021-08-22T04:22:21+5:30
शासनाने गाव हागणदारीमुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने अंमलबजावणी केली गेली; मात्र कोरोनाच्या ...
शासनाने गाव हागणदारीमुक्तीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने अंमलबजावणी केली गेली; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर शासकीय योजनांसह हागणदरीमुक्त योजना दुर्लक्षित झाली असली तरी कापशी ग्रामपंचायतीने कोरोनाच्या संकटकाळातही योजना तितक्याच ताकदीने पूर्णत्वास नेली. स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा नारा देत केंद्र सरकारने स्वच्छतेवर चांगलाच भर दिला आहे. शौचालयाच्या जनजागृतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून गावे, हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत कापशी ग्रामपंचायतीचे सरपंच अंबादास उमाळे यांनी ‘एक दिवस गावासाठी’ या संकल्पनेतून गावकरी व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने कापशी रोड गावाला कचरामुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गाव ‘ओडीएफ प्लस’ म्हणून घोषित झाले आहे.
----------------------
वैयक्तिक शौचालयाचा वापर, गावातील सांडपाणी व घनकचरा यांचे व्यवस्थापन, शाळा, अंगणवाडी व सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये स्वच्छतेविषयी सुविधा, प्रत्येक घरी नळाद्वारे पिण्याचे पाणी आदी सुविधा गावांमध्ये असणे याच धर्तीवर कापशी ग्रामपंचायतीने कामे केली आहेत. त्यामुळेच गावाला ओडीएफ प्लस होण्याचा बहुमान प्राप्त झाला.
- अंबादास उमाळे, सरपंच, कापशी रोड.
210821\img-20210821-wa0004.jpg
जिल्ह्यात प्रथम ओडीफ प्लस कापशी ग्रामपंचायत