पातूर : उद्याची संस्कारक्षम युवा पिढी घडविताना राष्ट्रसंतांचा विचार मनात रुजविला पाहिजे, हा संस्काराचा ठेवा पातूरच्या किड्स पॅराडाइजने जोपासला आहे, असे प्रतिपादन आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषणात केले. पातूर येथील किड्स पॅराडाइज पब्लिक स्कूल येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने शाळेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी प्रबोधनकार सत्यपाल महाराज, आमदार अमोल मिटकरी, शिक्षक आमदार ॲड. किरण सरनाईक, प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, बहुजन पत्रकार संघांचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुधाकरराव खुमकर, राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, श्री गुरुदेव सेवाश्रमचे अध्यक्ष तिमांडे महाराज, ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक नामदेवराव गव्हाळे, अ. भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनीष हिवराळे, ॲड. संतोष भोरे, रवी वानखडे, चौबे महाराज, ज्येष्ठ पत्रकार उमेश अलोने, दूरदर्शनचे प्रतिनिधी विशाल बोरे, मार्गदर्शक सरस्वताबाई गाडगे, सरपंच रिना शिरसाट, टीएनबी कॉलेजचे संचालक गणेश भाकरे, ब्लॉसम किड्सचे संचालक प्रा. सुधीर सरदार, पं. स. चे गटनेते अजय ढोणे, किड्स पॅराडाइजचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका ज्योत्स्ना गाडगे यांची उपस्थिती हाेती. प्रा. विलास राऊत यांनी संकल्पगीत सादर केले. त्यांना मंगेश राऊत यांनी साथसंगत केली. गोपाल गाडगे यांनी प्रास्ताविकमधून शाळेची वाटचाल विशद केली. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले तर आभार वंदना पोहरे यांनी मानले.
किड्स पॅराडाइज संस्कारक्षम पिढी घडविणारी शाळा- वेरुळकर गुरुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 4:15 AM