जिल्हा परिषदेच्या शाळेत कोविड चाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:46+5:302021-04-23T04:20:46+5:30
.............................................. चौकशी अंतिम टप्प्यात! अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कोविड रुग्णांच्या भोजन व्यवस्थेची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे अकोल्याचे ...
..............................................
चौकशी अंतिम टप्प्यात!
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) कोविड रुग्णांच्या भोजन व्यवस्थेची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी गुरुवारी सांगितले.
...................................................................................
‘बीइओं’ची सोमवारी बैठक
अकोला : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात सुरू होणार आहे. त्यानुषंगाने बदलीस पात्र शिक्षकांची माहिती व संबंधित इतर मुद्यांवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकऱ्यांची (बीइओ) बैठक बोलावली आहे.
.......................................................
कोविड सेंटरमधील व्यवस्थेची घेतली माहिती!.
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील व्यवस्थेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. रुग्णांकरिता उपलब्ध सुविधांचा आढावादेखील घेण्यात आला.
.........................................................................
थकीत पाणीपट्टी वसुलीचा आढावा!
अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत थकीत पाणीपट्टी वसुलीची मोहीम अकोला, अकोट पंचायत समितीमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी थकीत पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतला.
........................................................................