अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सोमवारपासून सुरु करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबतच दुर्धर आजारग्रस्तांना कोवीड लस मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोवीड लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात फ्रंटलाईनवरील आरोग्य विभागांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोवीड लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना कोवीड लसीकरण करण्याची मोहिम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सोमवार, ८ मार्चपासून सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेत ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसोबतच दुर्धर आजाराच्या रुग्णांनाही कोवीड लस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोवीड लसीकरणाची मोहिम ८ मार्चपासून सुरु करण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
डाॅ.सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.