निवासी डॉक्टरांवर कोविडचा ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:59+5:302021-03-29T04:12:59+5:30
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा सर्वाधिक ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या तुलनेत उपलब्ध ...
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्याचा सर्वाधिक ताण सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या तुलनेत उपलब्ध मनुष्यबळ कमी आहे. सद्य:स्थितीत एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा असल्याने रुग्णसेवेचा बहुतांश ताण सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर येत असल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयात नऊ वरिष्ठ, तर ७२ कनिष्ठ, असे एकूण ८१ निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. या सर्वांच्या ड्यूटी कोविड वॉर्डात रोटेशन पद्धतीनुसार लावण्यात येत आहेत. त्यामुळे यातील काही डॉक्टर कोविड वॉर्डात, तर काही डाॅक्टर नॉनकोविड वॉर्डात रुग्णसेवा देत आहेत. मध्यंतरी यातील काही डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने उर्वरित डॉक्टरांवरील कामाचा व्याप वाढला होता. त्याचा परिणाम डॉक्टरांच्या शिक्षणावरदेखील दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर - ८१
कोविड वॉर्डात ड्यूटी असलेले डॉक्टर - ८१
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी - १२००
असे चालते रोटेशन
सात दिवस कोविड वॉर्डात ड्यूटी
तीन दिवस क्वाॅरंटीन
सात दिवस डिपार्टमेंटमध्ये ड्यूटी
परीक्षेमुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची ड्यूटी नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची ड्यूटी लावण्यात आलेली नाही, अशी माहिती महाविद्यालयातर्फे देण्यात आली. या विद्यार्थ्यांची इतर डॉक्टरांना मोठी मदत होते, मात्र यंदा परीक्षेमुळे या विद्यार्थ्यांची ड्यूटी रुग्णालयात लावण्यात आली नाही.