कुटासा आध्यात्मिक व सर्वांगीण विकासाचे उगमस्थान व्हावे- विठ्ठल महाराज साबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:48+5:302021-03-29T04:12:48+5:30
टाळमृदंगाच्या गजरात परिसर निनादून गेला होता. कोरोनाच्या काळात खबरदारी घेत, केवळ पंधरा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ...
टाळमृदंगाच्या गजरात परिसर निनादून गेला होता. कोरोनाच्या काळात खबरदारी घेत, केवळ पंधरा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी सुश्राव्य भजनाचा छोटेखानी भजन सोहळा रंगला होता. रामकृष्ण आप्पाजी मिटकरी हे आयुष्यभर एक वारकरी म्हणून जीवन जगले. कुटासा येथे त्यांच्या स्मृतिस्थळी विठ्ठल मंदिराचे भूमिपूजन पार पडले. लवकरच येथे एक विठ्ठल मंदिर उभारल्या जाणार असल्याचा संकल्प यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवला. या माध्यमातून या भागात बालसंस्कार सर्वांगीण विकास शिबिरे, आध्यात्मिक विकास यासारखे उपक्रम सुरू व्हावे, असे प्रतिपादन सोहळ्याप्रसंगी विठ्ठल महाराज साबळे यांनी केले. शेतशिवारात फुललेले विठ्ठल मंदिर निश्चितच अध्यात्माचे केंद्र बनेल व या ठिकाणावरून भविष्यात विविध उपक्रम चालविल्या जातील अशी ग्वाही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. यावेळी हभप विठ्ठल महाराज साबळे, रतन महाराज वसू, विश्व वारकरी सेनेचे राज्य अध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे, गजानन महाराज येरोकर, विलास महाराज कराड, रवींद्र महाराज केंद्रे, रामकृष्ण महाराज आंबूस्कार, श्रीधर महाराज पातोंड, श्रीधर महाराज तळोकार, ज्ञानेश्वर महाराज जावरकर, विक्रम महाराज शेटे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज वसू, प्रकाश महाराज पांडे, सोपान महाराज काळुसे, संतोष महाराज घुगे, गजानन महाराज मोडक, सुभाष महाराज कावरे उपस्थित होते.
फोटो: