अकाेला: सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून अकाेला श्रमिक पत्रकार संघातर्फे सांगली-काेल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीचे ३१६ ब्लंॅकेट्स शुक्रवारी िजल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द करण्यात अाले. पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठीचा हा कार्यक्रम िजल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड प्रामुख्याने उपस्थित हाेते. मदत पत्रकार संघाच्या महिला सदस्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात अाली.
सांगली, कोल्हापूर िजल्हयातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. ठिकठिाकाणाहून सािहत्य पाठवण्यात येत अाहे. पूरग्रस्तांना असाच मदतीचा हात अकाेला श्रमिक पत्रकारसंघातर्फेही ब्लंॅकेट्सचे िवतरण करुन देण्यात अाला. १६ अाॅगस्ट राेजी िजल्हाधिकारी कार्यालयातील िनयाेजन भवन येथे मदत सुपुर्द करण्याची प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी अकोला श्रमिक पत्रकार संघाचे महेंद्र कविश्वर, अजय डांगे, राजेश शेगोकार, मनोज भिवगडे, अाशिष गावंडे, रविंद्र लाखोडे, दिलीप ब्राम्हणे, जीवन सोनटक्के, निलेश जोशी , पद्माकर अाखरे, शंतनु राऊत , सचिन राऊत , गोपाल हागे , शरद पाचपोर, सचिन देशपांडे, संतोष येलकर,सुगत खाडे, अनुप टाले, विवेक मेतकर, माणिक कांबळे, प्रविण ठाकरे, अतुल जयस्वाल, निलेश भांगे, प्रबोध देशपांडे, शिवाजी भोसले, अमित गांवडे, सुरेश राठोड उपस्थित हाेते. यावेळी िजल्हा मािहती कार्यालयातील मािहती अधिकारी िनतीन डाेंगरेही उपस्थित हाेते.
नारी शक्तिच्या हस्ते श्रीगणेशाअकाेला श्रमिक पत्रकार संघाच्या समाजिक कार्याचा श्रीगणेशा नारीशक्तिीच्या हस्ते पूग्रस्तांसाठी ब्लंॅकेट्सचे िवतरण करुन करण्यात अाला. पत्रकारसंघाच्या महिला प्रतिनिधी िनशाली पंचगाम, संगिता पातूरकर, करूणा भांडारकर, निलम तिवारी यांनी मदतीचा तपशील असलेले पत्र िजल्हाधिकारी िजतेंद्र पापळकर व िजल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अायुष प्रसाद यांना ब्लंॅकेट्सह सुपुर्द केले. िजल्हाधिकाऱ्यांनी ही मदत तातडीने पूरग्रस्तांपर्यंत पाेहाेचवण्याचा अादेश संबंधित अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार अधिकाऱ्यांनी हालचालीही सुरु केल्या.