एटीएम मशीन फोडून लाखोंची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 07:51 PM2017-08-17T19:51:18+5:302017-08-17T19:54:40+5:30
दिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील लाखो रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दीड महिन्यात सायवणी, चतारी, पिंपळखुटा, खेट्री, चान्नी आदी गावांत चोर्या झाल्या आहेत. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, सस्तीमधील चोरीची घटना यापैकी सर्वात मोठी आहे. या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

सस्ती येथे १६ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी गस्त घातली होती. त्यानंतर रात्री २ ते ४ वाजताच्या दरम्यान सस्ती येथे मुख्य रस्त्यावर असलेल्या एटीएम मशीनजवळ चोरांनी गाडी लावून गॅस कटरने शटर तोडून एटीएममध्ये प्रवेश केला. तेथील एटीएम मशीन फोडून त्यातील अंदाजे १२ लाख रुपयांची चोरी केली असल्याचे वृत्त आहे. या एटीएममध्ये पैसे टाकणार्या कर्मचार्याने ११ ऑगस्ट रोजी त्यात २१ लाख रुपये टाकले होते. या चोरीच्या घटनेबाबत येथील पोलीस पाटील बदरखे यांनी चान्नी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानंतर चान्नी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. त्यानंतर घटनास्थळावर फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांना येथील कॅमेर्यावर फिंगर प्रिंट दिसून आल्याचे वृत्त आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. ही चोरीची या परिसरातील सर्वात मोठी घटना असून, यामुळे परिसरातील गावांमधील नागरिक भयभीत झाले आहेत. परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे सस्ती येथील गावकर्यांनी एका गुरख्याला नियुक्त केले होते; परंतु तरीही ही चोरी घडली, हे विशेष. सदर गुरखा रात्री गस्त घालत होता. तरीही त्याला चोरटे दिसून आले नसल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, बाळापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख या वरिष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाला गती दिली आहे. ही चोरी होत असताना जवळ राहणार्या वयोवृद्धाने ते पाहिले; परंतु जीवाच्या भीतीने त्याने आरडाओरड केली नाही. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला आहे.