लाेकमत रक्ताचं नातं.... आज रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:30+5:302021-07-12T04:13:30+5:30
शिबिराचे उद्घाटन अकाेला वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या हस्ते हाेईल. यावेळी वऱ्हाडी साहित्यिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ...
शिबिराचे उद्घाटन अकाेला वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या हस्ते हाेईल. यावेळी वऱ्हाडी साहित्यिक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, निसर्गप्रेमी अजय गावंडे, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बगाडे, नरेंद्र चिमणकर, जागर फाउंडेशनचे तुलसीदास खिराेडकार यांची प्रमुख उपस्थिती राहील.
—————————-
साहित्यिक संस्थांचा सहभाग
इन्कम टॅक्स चाैकात आयाेजित रक्तदान शिबिरात साहित्यिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, वऱ्हाडी कट्टा, संवाद साहित्य मैफिल, अंकुर साहित्य संघ, सृजन साहित्य संघ, साहित्य वार्ता यासह माणुसकी फाउंडेशनच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार आहे.
—————-
जय बाभळेश्वरतर्फे रक्तदान महायज्ञ
लोकमत परिवार, शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान अकोला, यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, १२ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता श्री राजेश्वर कॉन्व्हेंट रेणुका नगर, डाबकी रोड अकोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी रक्तदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
—————