अकोला - जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गत दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकऱ्यांवर जणू आभाळच कोसळले.वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा सर्वधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकला बसला आहे.तसेच तूर, गहू, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतक-यांची तारांबळसध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.