अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे आरक्षणही मिळत नसल्याची स्थिती आहे. काही मार्गावर रेल्वेची संख्याही वाढविण्यात आली आहे.
रोज ७० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री
लॉकडाऊन काळात प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते.
त्यामुळे तिकीट विक्री घटली होती. परिणामी, आर्थिक नुकसान वाढले होते.
आता रोज ४०-७० तिकिटांची विक्री होते. रेल्वेच्या उत्पादनातही वाढ झाली आहे.
वर्षभर होता ५० रुपयांचा भुर्दंड
कोरोनापूर्वी सर्वच स्थानकांवर दहा रुपये प्लॅटफॉर्म तिकीट होते. यानंतर कोरोनाकाळात प्लॅटफॉर्मचे तिकीट ५० रुपये झाले. जवळपास वर्षभर प्रवाशांना ५० रुपयांचा भुर्दंड बसला. त्यानंतर दोन-अडीच महिन्यापासून दहा रुपये केले आहे; मात्र याकाळात अकोला रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या कमाईला फटका बसला आहे. दरवाढ होऊनही अपेक्षित कमाई होऊ शकली नाही. आता रेल्वे पुन्हा रुळावर आल्याने उत्पन्नात वाढ होत आहे.
सुरू असलेल्या रेल्वे
मुंबई - गोंदिया
मुंबई - अमरावती
कोल्हापूर - गोंदिया
मुंबई - हावडा
मुंबई - नागपूर
हावडा - पुणे