घातक वायूची गळती; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:41 AM2017-08-01T02:41:53+5:302017-08-01T02:44:45+5:30
अकोला: तहसील कार्यालयासमोर असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलातील एका आॅफसेटमधून आरोग्यास घातक असलेल्या विषारी अमोनियाच्या वेस्टेज रसायनाची गळती झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: तहसील कार्यालयासमोर असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलातील एका आॅफसेटमधून आरोग्यास घातक असलेल्या विषारी अमोनियाच्या वेस्टेज रसायनाची गळती झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुरू केली आहे.
महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये प्रकाश आॅफसेट अॅण्ड प्रिंटिंगचे प्रतिष्ठान आहे. या ठिकाणावरून ब्ल्यू प्रिंटचे कामकाज करण्यात येत असल्याने अमोनियासह विविध प्रकारच्या रसायनांची या ठिकाणी साठवणूक करण्यात येते. बुधवारी सायंकाळी प्रकाश आॅफसेटमधून अमोनिया वेस्टेजच्या केमिकलची (लिक्विड फार्म्समध्ये) असलेल्या रसायनाची अचानकच वायुगळती झाली. एका घातक रसायनाची वायुगळती सुरू झाल्याने काही मिनिटांतच संपूर्ण व्यापारी संकुलातील दुकाने बंद करण्यात आली. या वायूच्या गळतीमुळे गांधी चौक, पंचायत समितीसमोरील परिसर, वसंत टॉकीज व तहसील कार्यालयातील अनेकांना त्रास झाला. या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाल्यानंतर त्यांच्या अधिकाºयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
घटनास्थळाची पाहणी करून अहवाल
लोकमतच्या वृत्तानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सदर प्रतिष्ठानांची पाहणी केली; मात्र ही वायुगळती किरकोळ प्रमाणात असल्याने रात्रीच्या १२ तासातच त्याचे परिणाम व दुर्गंधी कमी झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
तहसील कार्यालयासमोरील व्यापारी संकुलात झालेल्या रसायनाच्या गळतीची घटनास्थळावर दाखल होऊन अधिकाºयांनी तपासणी केली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी बयान नोंदविण्यात आले असून, त्याद्वारे अहवाल तयार करण्यात येत आहे.
- राहुल मोटे, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी