मूर्तिजापूर : तालुक्यातील सालतवडा येथील एका शेतात कुत्रे हरणाचा पाठलाग करीत असताना शेत मालकाने त्यांच्या तावडीतून त्या हरणाचा जीव वाचविला. शिकारीच्या उद्देशाने त्या हरणाला भाला मारुन जखमी केल्याचे उघड झाले. सालतवडा येथील शेतकरी शुभम पाचडे यांच्या शेतात एका हरणाचा कुत्रे पाठराग करीत असल्याचे त्यांना आढळून आले असता त्यांनी हरणाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. व सर्पमित्र संजय दोड यांना माहिती दिली. संजय दोड यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देऊन व पशुवैद्यकीय अधिकारी जावरकर यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठून जखमी हरणावर तातडीने उपचार करुन त्याचे प्राण वाचविण्याची घटना बुधवारी घडली, डॉ. जावरकर यांच्या म्हणण्यानुसार सदर हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने शिकाऱ्यांनी हरणाला भोसकल्याच्या जखमा दिसून आल्या. उपचारानंतर हरणाला येथी लघु पशुवैद्यकीय केंद्रात दाखल करुन पुढे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात येत आहेत.
शिकारीच्या उद्देशाने भाला मारुन जखमी केलेल्या हरणाचे वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 7:54 PM