शेतकरी जागर मंचच्या धर्तीवर सिन्हांचा ‘राष्ट्रमंच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:56 AM2018-01-28T03:56:40+5:302018-01-28T03:57:11+5:30
शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळालेले यश यामुळेच येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी दिल्ल्लीमध्ये ‘राष्ट्रमंच’ नावाचे स्वतंत्र विचार मंचची ते पायाभरणी करीत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत
सिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळालेले यश यामुळेच येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी दिल्ल्लीमध्ये ‘राष्ट्रमंच’ नावाचे स्वतंत्र विचार मंचची ते पायाभरणी करीत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
यशवंत सिन्हा यांनी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या व्यासपीठावर येत नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या विरोधात आसूड ओढले होते. या व्याख्यानादरम्यानच त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलन उभारण्याची घोषणा केली
होती. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी आयोजित कापूस-सोयाबीन-धान ‘कासोधा’ परिषदेत त्यांनी आंदोलन पुकारुन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडला होता.
या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे सिन्हा
यांना नव्या लढाईचे बळ मिळाले. त्यातूनच शेतकरी जागर मंच आकाराला आला आहे.
‘राष्टÑमंच’साठी यशवंत सिन्हा यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी, युवा नेते रविकांत तुपकर, माजी खासदार नाना पटोले, आमदार आशिष देशमुख, शंकर अण्णा धोंडगे आदींसह अकोल्यातून शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, रवी अरबट, डॉ.दीपक धोटे, मो.रेहान यांना आमंत्रित केले आहे.
‘कासोधा’च्या आश्वासनांची पूर्ती नाही
शेतकरी जागर मंचने पुकारलेल्या ‘कासोधा’ आंदोलनाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या; मात्र आंदोलन होऊन दीड महिना संपला, तरी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकरी जागर मंच पुन्हा आंदोलनाची तयारी करीत असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.