रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर केले कोळी नृत्य, राहुल गांधी यांचे वेधले लक्ष
By आशीष गावंडे | Published: November 17, 2022 07:33 PM2022-11-17T19:33:56+5:302022-11-17T19:34:46+5:30
रायगड मधील चिमुकल्या मुलींनी सादर कोळी नृत्य सादर करून राहुल गांधी यांचे लक्ष वेधले.
अकोला : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोड़ो' पदयात्रा गुरुवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे पोहोचली असता त्यांचे स्वागत रायगड येथून आलेल्या चिमुकल्या मुलींनी केले. मुलींनी कोळी नृत्य सादर करून राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. यावेळी गांधी यांनी क्षणभर थांबून मुलींची विचारपूस केली.
केंद्रात तत्कालीन कॉंग्रेस सरकारच्या कालावधीत शेतकरी व कोकणातील कोळी बांधवांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोकणातून रायगड येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी ३०० जनांसह थेट अकोला जिल्हा गाठले. यामध्ये कोळी नृत्य सादर करणाऱ्या सुमारे ४० मुलामुलींचा सहभाग होता. महेंद्र घरत यांच्या चमूसाठी मुंबई येथील उद्योजक तुकाराम दुधे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवाजी म्हैसने यांनी राज्य महामार्गालगत व्यवस्था उभारली होती. यावेळी घरत यांनी राहुल गांधी यांना नावेची प्रतिमा भेट दिली.