कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:55 PM2018-11-12T17:55:28+5:302018-11-12T17:55:45+5:30
पातूर (अकोला) : राजस्थानातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना पातूर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी जीवनदान दिले.
पातूर (अकोला) : राजस्थानातून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना पातूर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी जीवनदान दिले. उंटाच्या तस्करी प्रकरणात तीन राज्यातील रॅकेट सक्रीय असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
राजस्थान येथून ५० ते ६० उंटांना कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहीती पातूर पोलिसांना मिळाली. या उंटांना राजस्थान येथून बाळापूर, पातूर मार्गे वाशिम तेथून हैदराबाद येथे नेण्यात येत होते. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी उंटाचा काफीला पातूरजवळ थांबवनू ५७ उंटांना जीवनदान दिले. उंटाच्या तस्करीचे रॅकेट तीन राज्यात सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होते. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वृत्त लिहीस्तोवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती.(तालुका प्रतिनिधी)