अकोला : राजस्थानमधून तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ५७ उंटांना सोमवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे जीवदान मिळाले. हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या माहितीवरून पातूर पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. उंटांची किंमत सुमारे ५७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून, उंटांच्या तस्करीमागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अकोला मार्गे ५७ उंट हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहिती हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाºयांना मिळाली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी पातूर तालुक्यातील चिचखेड फाट्यानजीक उंट ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी तक्रार देण्यासाठी पातूर पोलिस ठाणे गाठले असता पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाºयांनी अमरावतीच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.राजस्थान सरकारने उंट हा अति संरक्षित प्राणी घोषित केला आहे. इंटरनॅशन युनियन फॉर कंझवर््हेशन आॅफ नेचर अॅण्ड नॅचरल रिसोर्सेस या आंतरराष्ट्रीय संस्थेने तर उंट हा जवळपास विलुप्त झालेला प्राणी घोषित केला आहे. उंटांच्या संरक्षणासाठी राजस्थान सरकारने २०१५ मध्ये कायदा पारित केला. तरीदेखील दरवर्षी राजस्थानातून शेकडो उंटांची पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये कत्तलीसाठी तस्करी केली जाते. पश्चिम बंगालमधून उंट पुढे बांगलादेशातही धाडण्यात येतात. राजस्थानातून एका उंटाची दहा ते पंधरा हजारात खरेदी केली जाते आणि कत्तलखान्यांना सुमारे एक लाख रुपयात विक्री केली जाते.यूपी, हरियाणात उंट तस्करी केंद्रेफूड अॅण्ड सेफ्टी स्टँडर्डस् अॅक्टनुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे. भारतीय पशू कल्याण मंडळाने १४ आॅगस्ट २०१७ रोजी तसे परिपत्रकदेखील जारी केले आहे. तरीदेखील देशाच्या काही भागांमध्ये उंटाचे मांस भक्षण केले जाते आणि त्याच्या कातडीचेही विविध उपयोग आहेत. त्यामुळे उंटांना मोठी मागणी आहे. या अवैध व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. उत्तर प्रदेशमधील बागपत व गाझियाबाद आणि हरयाणातील मेवात ही उंट तस्करांची मोठी केंद्रे आहेत.