Lockdown Efect : पशु, पक्ष्यावरील संशोधन रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:28 PM2020-04-27T17:28:47+5:302020-04-27T17:28:56+5:30
अकोल्यातील पदव्युत्तर पशु विज्ञान संस्थेत पशू, पक्षावर चालणारे संशोधन रखडले आहे.
अकोला : महाराष्ट्र राज्य मत्स्य,पशु विज्ञान विद्यापीठांतर्गत अकोल्यातील पदव्युत्तर पशु विज्ञान संस्थेत पशू, पक्षावर चालणारे संशोधन रखडले आहे. विदयार्थी करीत असलेल्या संशोधनाचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित करण्यात आल्याने महाराष्ट्र राज्य मत्स्य ,पशु आणि विज्ञान विद्यापीठतातर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्याना अगोदरच घरी पाठविण्यात आले आहे. यातील अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे संशोधन आहे .हे विद्यार्थी पक्षांवर व प्राण्यांवर अभ्यास करीत आहे तसेच शास्त्रज्ञ देखील विविध संशोधन करीत आहेत फेब्रुवारी, मार्च महिन्यात यावर अधिक भर दिला जातो परंतु टाळेबंदी मुळे हे संशोधन थांबले आहे .
या संशोधनामध्ये पशुप्रजनन नवीन संशोधन पक्ष्यांची संख्या वाढवणे आजार अनेक प्रकारच्या व्याधी आधीचे संशोधन केले जाते .ब्रायलार पक्षी उत्पादन क्षमता वाढविणे, उन्हाळ्यात येणारे रोग, पक्ष्यांना लागणारे पोषक खाद्य आदी संशोधन केले जाते.ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर संशोधन सुरू केले होते ते मात्र सुरू आहे. त्यांना आॅनलाईन मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अकोला येथे देशातील दुसरी महत्त्वाची पदव्युत्तर संस्था अकोल्यात आहे. मोरणा थडी ची म्हैस ,बेरारी शेळ्या,कुकुट यावर या संस्थेने अभ्यास केला आहे .खाऱ्या पाण्याचे पक्षी प्राण्यांवर होणारे परिणाम यावरही अभ्यास केला आहे .पशुपक्ष्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या संस्थेचे काम टाळेबंदी मुळे सध्यातरी रखडले आहेत इतर कामे मात्र सुरू आहे विद्यार्थ्यांना आॅनलाइन मार्गदर्शन करण्यात येत आहे .
या संस्थेत विविध पशु ,प्राण्यांवर संशोधन सुरू असते शास्त्रज्ञ सह विद्यार्थीही त्यांना आवश्यक संशोधन करीत असतात परंतु सध्या हे संशोधन पुढे ढकलले आहे जे विद्यार्थी अगोदर संशोधन करीत होते हे मात्र सुरू आहे .
- डॉ सतीश मनवर,
पदव्युत्तर पशु आणि मत्स्य विज्ञान संस्था ,अकोला .