Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी केला एअर स्ट्राइकचा उदोउदो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:14 PM2019-04-16T12:14:57+5:302019-04-16T12:15:50+5:30

देशाचे भविष्य घडविणारी निवडणूक असून, त्याकरिता मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Lok Sabha Election 2019: Chief Minister made Air Strike Glorification | Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी केला एअर स्ट्राइकचा उदोउदो !

Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी केला एअर स्ट्राइकचा उदोउदो !

Next

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश व देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मोदींनी एअर स्ट्राइक केले व देशाचा आत्मसन्मान वाढविला; मात्र या कारवाईचेही विरोधक पुरावे मागत असून, त्यांच्या जाहीरनाम्यात राष्टÑद्रोहाचे कलम रद्द करण्याची घोषणा करीत आहेत. ही निवडणूक गल्लीतली निवडणूक नाही, तर देशाचे भविष्य घडविणारी निवडणूक असून, त्याकरिता मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी तेल्हाºयात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. संजय धोत्रे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी एअर स्ट्राइकच्या मुद्यावर विरोधकांना धारेवर धरले. जगात देशाचा सन्मान वाढत असताना विरोधकांना मात्र राष्टÑद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन द्यावे लागते, हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. देशातील गरिबीविरुद्ध नरेंद्र मोदी हेच खरी लढाई लढत असून, केंद्रातून निघणारा एक रुपया कोणत्याही दलालीशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात आता जमा होत आहे, असा दावाही त्यांनी केला. आ. प्रकाश भारसाकळे यांनी प्रास्ताविक केले.
दिल्लीचा हाच मार्ग
तेल्हाºयात मुख्यमंत्र्यांची सभा घेण्याचे कारण म्हणजे पहिल्या सभेचे टोक व या सभेचे टोक उत्तर दिशेने असून, दिल्लीला जाण्याकरिता हाच मार्ग आहे, असे संजय धोत्रे यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
अन् महिला पोलीस कर्मचाºयाची प्रकृती बिघडली
मुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना एका महिला पोलिसाला चक्कर आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाणी द्या, असे म्हणून आपले भाषण थांबविले. त्यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटीलसह इतर अधिकारी व मंचावरील मान्यवर त्या दिशेने धावले. त्या महिलेला बरे वाटत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपले उर्वरित भाषण पूर्ण केले.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत ‘शिवसंग्राम’चाही सहभाग
भाजपा, शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामने अकोल्यात युतीच्या प्रचारापासून दूर राहण्यातच धन्यता मानली होती. मुख्यमंत्र्यांनी तेल्हाऱ्यात सोमवारी घेतलेल्या प्रचार सभेत शिवसंग्रामचे अकोल्यातील नेते संदीप पाटील यांनी उपस्थिती दर्शवित या दोन पक्षातील दुरावा संपल्याचे संकेत दिले.
विनायक मेटे यांच्या नेतृत्वातील शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्तेही अकोल्यात युतीच्या प्रचारापासून दूरच दिसत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाच्या तिकिटावरून झालेल्या राजकारणामुळे अकोल्यात शिवसंग्राम आणि खासदार गटामध्ये निर्माण झालेली दरी पुढच्या पाच वर्षात रुंदावली आहे. या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी विनायक मेटे यांनी नागपुरात मेळावा घेऊन युती धर्म पाळला आहे; मात्र अकोल्यात शिवसंग्राम प्रचारातून गायबच होते. सोमवारी या दोन पक्षातील दरी संपल्याचे दिसून आले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Chief Minister made Air Strike Glorification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.