Lok Sabha Election 2019 : विशेष मोहिमेमुळे वाढला दिव्यांग मतदानाचा टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 03:33 PM2019-04-19T15:33:17+5:302019-04-19T15:33:24+5:30
अकोला: दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने प्रथमच विशेष मोहीम राबविल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्क ा वाढला आहे.
अकोला: दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने प्रथमच विशेष मोहीम राबविल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्क ा वाढला आहे. व्हीलचेअर आणि रॅम्पची सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असल्याने ही टक्केवारी वाढली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ७७५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने त्यांची टक्केवारी नगण्य असते. दिव्यांग मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदार साक्षरता अभियानासाठी अग्रणीदूत म्हणून प्रा. विशाल कोरडे यांची निवड केली. दिव्यांग असलेल्या प्रा. कोरडे यांच्या नेतृत्वात शहरात जनजागृती केल्याने दिव्यांगांच्या मतदानाचा टक्क ा वाढला. दिव्यांगाचे ८० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रा. कोरडे यांनी दिली.
१५० दिव्यांगांची नोंद नाही
गुरुवारी मतदान केंद्रावर आलेल्या अनेक दिव्यांगांचे नाव सामान्य सूचित आढळले. वास्तविक पाहता दिव्यांगांच्या सूचित नावे आली पाहिजे होती. अशांची मोजणी दिव्यांग संघटनांनी केली असता १५० दिव्यांगांची नोंद नसल्याचे समोर आले. अशी माहिती प्रा. कोरडे यांनी दिली.
दिव्यांगांना दिला मदतीचा हात
दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गुरुवारी अकोला आर्ट गॅलरीच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला. यासाठी विजय कोरडे, वैष्णवी गोतमारे, सुरभी दोडके, गजानन भांबुरकर, प्रसाद झाडे, नचिकेत बडगुजर, श्रीकांत तळोकार, संजय शेळके, तुषार सिंगोकार यांनी सहकार्य केले.