शेतकरी पुत्रांचे ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’ आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 07:26 PM2021-02-14T19:26:58+5:302021-02-14T19:36:36+5:30
Save My First Valentine जिल्हाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प व ग्रीटींग देऊन शेतकरी माय बाप व शेती या आमच्या पहिल्या प्रेमाला वाचवा, अशी मागणी केली.
अकोला: शेतकरी आमचे माय-बाप अन् शेती ही आमची काळी आई आहे. आमच्या या पहिल्या प्रेमाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीनही कृषी कायदे रद्द करावे, अशा मागणीसाठी शेतकरी जागरमंचतर्फे १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’ आंदोलन करण्यात आले. शेतकरी पुत्रांनी आंदोलनाला साद देत शहरातून रॅली काढली. यावेळी सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन म्हणत प्र. अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे गुलाब पुष्प व ग्रीटींग दिले. शेतकरी जागर मंचच्या नेतृत्वात युवक व युवतींनी महानगरपालीका येथून आदोलनाला सुरुवात केली. या रॅलीचे नेतृत्व युवतींनी केले. रॅली दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदार व ग्राहकांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देवून व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा दिल्या. गांधी रोड वरील संघ मुख्यालयात जावून युवकांनी गुलाबपुष्प व ग्रीटींग दिले. तसेच पंतप्रधानांना हे काळे कायदे मागे घ्यायला सांगा, अशी विनंती केली.
समोर आळशी संकुल येथील भाजप कार्यालयात सचिवाला गुलाबपुष्प व ग्रीटींग देवून काळे कायदे मागे घ्यायला सांगा, अशी विनंती तरुणांनी केली. तरुणांनी गुलाबपुष्प व ग्रिटींग देत टावर चौक, बस स्टॅंड व जिल्हाधिकारी निवासस्थानमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात युवक पोहोचले. शेकडो युवकांनी अप्पर जिल्हाधीकरी अनिल खंडागळे यांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देवून ‘सेव्ह माय फर्स्ट व्हॅलेंटाईन’, अशी विनंती केली. आंदोलनात शेतकरी जागर मंचते संयोजक कपील ढोके, ॲड.कोमल हरणे, अक्षय राऊत, अंकीता अंधारे,शिवानी डिवरे, राधिका पाटील,प्राची घडेकार, सुमैय्याअली ,मृणाल इंगळे, आकाश कवडे, कुणाल शिंदे, अंकुश गावंडे, कुणाल डिवरे, रितेश महल्ले, सारंग शिंदे, अंकुश तायडे, आकाश पवार, रेहान, वैभव चऱ्हाटे, पवन मंगळे, पवन गावंडे, शाम मनतकार, उद्धव भाकरे,शैलेश बोदडे,अभिषेक वानखडे अभिजीत मुळे,बंटी मुरुमकार, केदार बकाल, रेहान,देवानंद गावंडे यांच्यासह शेकडो युवक सहभागी होते.