लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाच्या संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे व शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यात लढत होत आहे. खा.धोत्रे हे सलग चौथ्यांदा रिंगणात असल्याने त्यांची ‘व्होट बँक’ कमी करण्यासाठी गावंडे यांनी भाजपा व्यतिरिक्त इतर नेत्यांचे पाठबळ मिळविले असल्याने ही निवडणूक रंगतदार झाली आहे. तर दुसरीकडे खा.धोत्रे यांच्यासाठी त्यांचे सर्मथक मतदारांच्या थेट गाठी-भेठी घेऊन मोर्चेबांधणी भक्कम करताना दिसत आहेत. ल्ल महाबीजचे दोन मतदारसंघ असून, विदर्भ विभाग मतदारसंघात विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा व बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव व नांदुरा तालुक्यातील सर्व कृषक भागधारक मतदान करणार आहेत.उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघात विदर्भ वगळून परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे व मुंबई तसेच बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव व नांदुरा वगळून सर्व तालुक्यातील सर्व कृषक भागधारकांना संचालक निवडून द्यायचे आहेत.खासदार संजय धोत्रे या अगोदर तीन वेळा महाबीजच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून निवडून आले असून, लोकसभा मतदारसंघाप्रमाणे या मतदारसंघावरही त्यांची भक्कम पकड आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीच्या मुद्यावर राज्यातील भाजपा सरकारच्या प्रती निर्माण झालेला रोष या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी भागधारक काढतील, अशा आशेने प्रशांत गावंडे यांनी ‘फिल्डींग’ लावली आहे. त्यांना भाजपा विरोधातील पक्षांच्या नेत्यांनी पाठबळ देत आपले वजन गावंडे यांच्या पारड्यात टाकले आहे. या निवडणुकीचा अन् शेतकरी जागर मंचचा थेट संबंध नसला तरी शेतकरी जागर मंचने घेतलेल्या ‘कासोधा’ परिषदेच्या निमित्ताने प्रशांत गावंडे हे चांगलेच चर्चेत आले असून, त्याचाही फायदा त्यांना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे खा.धोत्रे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. रणजित सपकाळ, श्रावण इंगळे, महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील आदी नेत्यांनी खा.धोत्रे यांच्यासाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर खा.धोत्रे सर्मथकांचा भर असल्याने शेवटच्या चार दिवसात खा.धोत्रे यांच्या बाजूने जास्तीत जास्त मतदान उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खा.धोत्रे यांच्या नेतृत्वात अकोल्यातील जवळपास सर्वच संस्थांवर भाजपाचे वर्चस्व आहे, त्यामुळे महाबीजमध्ये विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीतच त्यांचे सर्मथक गुंतले असल्याने ही निवडणूक रंगतदार ठरली आहे. दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रातून बुलडाणा जिल्हय़ातील अमडापूरच्या संचालकपदी वल्लभराव देशमुख अविरोध निवडून आले आहेत.
महाबीज निवडणुकीत रंगत वाढली; मतदानासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 1:25 AM
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाच्या संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे व शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांच्यात लढत होत आहे. खा.धोत्रे हे सलग चौथ्यांदा रिंगणात असल्याने त्यांची ‘व्होट बँक’ कमी करण्यासाठी गावंडे यांनी भाजपा व्यतिरिक्त इतर नेत्यांचे पाठबळ मिळविले असल्याने ही निवडणूक रंगतदार झाली आहे.
ठळक मुद्देसर्मथकांचे गाठीभेठी सत्र सुरू!