महाबीज बीटी कापसाचे बीजोत्पादन अंतिम टप्प्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:40 PM2018-03-31T14:40:25+5:302018-03-31T14:40:25+5:30
अकोला: अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या बीटी कापसाचे बीजोत्पादन अंतिम टप्प्यात असून, विपणनासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) येत्या २०१९ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.
अकोला: अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या बीटी कापसाचे बीजोत्पादन अंतिम टप्प्यात असून, विपणनासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) येत्या २०१९ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपलब्ध केले जाणार आहे.
या दोन्ही कृषी विद्यापीठांनी पीकेव्ही हायब्रीड-२ व एनएचएच-४४ यामध्ये एका खासगी बायोटेक कंपनीसोबात करार करू न बोलगार्ड-२ तंत्रज्ञनाचे तांत्रिक प्रक्रियेचे संपूर्ण पालन करू न अंतर्भाव करण्यात आला आहे. केंद्र शासनाने या अगोदर मान्यता दिलेल्या या दोन्ही वाणांना राज्य शासनाच्या कृषी विभागाने या राज्यात विपणनाकरिता मान्यता देण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही वाण बीजोत्पादन प्रक्रि येत आहेत. यापूर्वी या वाणाचे गुजरात व कर्नाटक या दोन राज्यात प्रायोगिक तत्त्वावर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला असून, यातून प्राप्त झालेल्या संकरित बियाण्यांमधून येत्या २०१८ च्या खरीप हंगामात कृषी विद्यापीठ व महाबीज स्तरावर या दोन्ही वाणांचे पीक प्रात्यक्षिक घेण्याचे महाबीजने नियोजन केले आहे.
बीटी कापूस वाण विकसित करण्याकरिता कमीत कमी तीन वर्षांचा कालावधी लागतो. त्यानंतर मूलभूत बियाणे तयार करण्याची प्रक्रिया व त्यानंतर संकरित बीजोत्पादन घ्यावे लागते. हा सर्व कालावधी लक्षात घेऊनच महाबीज व कृषी विद्यापीठांनी हे वाण २०१९ च्या खरीप हंगामात उपलब्ध करू न देण्याचे ठरविले आहे. या वाणांवर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे या वाणांच्या उपलब्धतेवर परिणाम झाला नसल्याचा दावा महाबीजने केला आहे.
महाबीज बीटी वाणांची बीजप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, २०१९ च्या खरीप हंगामात दोन वाण शेतकºयांना पेरणीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या वाणांच्या विपणनाची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. बोंडअळीचा या वाणाच्या उपलब्धतेवर कोणाताही परिणाम झाला नाही.
ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.