महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गुण व कौशल्याचा वापर ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी करावा - मुख्य अभियंता अरविंद भादिकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:16 PM2018-01-29T16:16:29+5:302018-01-29T16:24:44+5:30
अकोला : महावितरणमध्ये विविध गुण व कौशल्य असलेले कर्मचारी कार्यरत असून, नाट्य व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्यांनी गुण आणि कौशल्याचा वापर इतर क्षेत्रासोबतच कंपनी व ग्राहकांसाठी करून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले.
अकोला : महावितरणमध्ये विविध गुण व कौशल्य असलेले कर्मचारी कार्यरत असून, नाट्य व क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, त्यांनी गुण आणि कौशल्याचा वापर इतर क्षेत्रासोबतच कंपनी व ग्राहकांसाठी करून महावितरणचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन अकोला परीमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले. विद्युत भवनाच्या क्रीडा भवन सभागृहात आयोजित क्रीडा स्पर्धा पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्युत भवन येथे २५ व २६ जानेवारी रोजी महावितरण अंतर्गत कर्मचाºयांच्या टेबलटेनिस व कॅरम स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या व्यासपीठावर अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कार्यकारी अभियंता डी.एम.मानकर, प्रणाली विश्लेषक सचिन राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे व जनसंपर्क अधिकारी विकास आढे उपस्थित होते. स्पर्धेतील पुरुष गटामध्ये कॅरम प्रथम: सुरेंद्र श्रीरसागर, द्वितीय: अनिल मेसरे तर टेबलटेनिस प्रथम: संजय जांगीड, द्वितीय: संदीप वानखडे तसेच महिला गटामध्ये कॅरम प्रथम: ऋतुजा पाटखेडकर, द्वितीय कृतिका भागवत आणि टेबलटेनिस प्रथम: स्वाती जाधव तर द्वितीय: कोमल पुरोहित यांनी क्रमांक पटकाविला. या सर्व विजेता व उपविजेत्याचा सत्कार मुख्य अभियंता व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शहर विभागात वरिष्ठ तंत्रज्ञ असलेले कैलास बचे यांची कन्या दिया बचे हिने बॉक्सिगच्या राष्टीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सातत्यपूर्णपणे करीत असलेल्या कामगिरीबद्दल तसेच अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ६३ व्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिग स्पर्धेत रजत पदक पटकाविल्याबद्दल तीचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. महावितरणमध्ये सेवा बजावीत असताना सोबतच विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरी व योगदानाबद्दल यामध्ये क्रिकेटमधे भरत डिककर आणि नाट्याक्षेत्रामध्ये वंदना बाबर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी देशभक्तीवर गीत तंत्रज्ञ सुखराम बुंदेले यांनी तर ऋतुजा पांटखेडकर यांनी पसायदान सादर केले. संचालन व आभार उपवव्यस्थापक गुरमीतसिह गोसल यांनी तर प्रास्ताविक उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे यांनी केले.