अकोल्यात फुलपाखरांचे मराठी बारसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:54 AM2020-09-16T10:54:45+5:302020-09-16T10:55:05+5:30

अकोल्याच्या परिसरात तब्बल ९१ पेक्षा अधिक प्रजातीची फुलपाखरे बागडत असतात.

Marathi Names to butterflies in Akola | अकोल्यात फुलपाखरांचे मराठी बारसे

अकोल्यात फुलपाखरांचे मराठी बारसे

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्राणी विश्वातील फुलपाखरे हा असा एकमेव जीव आहे जो मानवी मनाला विस्मयचकीत करीत असतो. त्यांच्या आकारातील विविधता, चमकदार रंगसंगती, पंखांच्या रोमांचकारी हालचाली आपल्याला एका वेगळ्याच आनंदाची अनुभूती देत असतात. अकोल्याच्या परिसरात तब्बल ९१ पेक्षा अधिक प्रजातीची फुलपाखरे बागडत असतात. वाढत्या प्रदूषण व पर्यावरणाच्या ºहासामुळे फुलपाखरांचा वावर काही थांबला आहे. तो पूर्णत: थांबला तर जैवविविधता धोक्यात येऊ शकते.
निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेला परिसर अकोल्याला लाभला आहे. त्यामुळेच जिल्ह्यामध्ये चांगल्या संख्येमध्ये जैवविविधता आहे. उत्तरेकडे मेळघाटचे छत्र, पूर्वेकडे गवताळ माळरानांचा प्रदेश तर पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये जैवविविधता संपन्न वनांचा समावेश आहे. त्यामुळेच अनेक प्रकारची फुलपाखरे अकोला जिल्ह्यामध्ये आढळतात. फुलपाखरांचं अस्तित्व असते ते वनस्पतींतील विविधतेमुळे. फुलपाखरांना आपल्या जीवनक्रमामध्ये अन्न वनस्पती व आधार वनस्पती या दोन्हीची गरज असते. फुलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे . सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये सर्वत्र हिरवळ पसरली असून, अनेक रानफुले निसर्गाचे सौंदर्य वाढवित आहे. या फुलांवर सध्या फुलपाखरांचे बागडणे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. फुलपाखराचं हे बागडणं शहरातही होते; मात्र कॉंक्रीटचे जंगल वाढत गेले अन् फुलपाखरांनी शहरातून काढता पाय घेतला. आता ज्यांच्या घरी बाग आहे, फुलझाडे आहेत येथे फुलपाखरे दिसतात. त्यामुळे फुलपाखरांना बागडण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.


फुले तोडू नका, फवारणीचाही धोका
शहरातील फुलपाखरांची संख्या कमी होण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील झाडांवरची फुले अनेक कारणांमुळे का हाईना तोडली जाणे, फुलांची संख्या कमी होणे, शेती प्रदेशातील कीटनाशकांच्या फवारणीमुळे, शहरातील प्रदूषणामुळे आणि शिकारी पक्ष्यांमुळे फुलपाखरांवर संकट उभे ठाकले आहे.
 
२२ वर्षापासून सुरू आहे उपक्रम 

अकोल्यातील पर्यावरण अभ्यासक उदय वझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलपाखरांना मराठी नावे देण्याचा उपक्रम गेल्या २२ वर्षापासून सुरू केला आहे. फुलपाखरांच्या अस्तित्वासाठी फुले तोडू नका, हा उपक्रमही राबविला आहे. यावर्षी कोरोनासंकटात कुठलाही कार्यक्रम नसला तरी जनजागृती सुरूच आहे.

फुलपाखरांसाठी एवढेच करा
अनेक उद्यानांमधून वृक्ष, लता, वेली याचे रोपण अशाच वनस्पतींची निवड करा ज्यामुळे फुलपाखरे, पतंग, मधमाशा आणि अनेक कीटकांना अन्न व आश्रय मिळेल. स्थानिक किंवा संपूर्ण भारतीय / देशी झाडे लावणे, फुलपाखरांना मकरंद (नेक्टर) मिळेल अशा वनस्पतींची लागवड करणे, झाडावरील फुले फुलपाखरे व इतर कीटकांसाठी अबाधित ठेवणे, त्रास देणाºया किडींपासून सुटका करून घेण्यासाठी फुलपाखरासारख्या कीटकांचा संहार होणार नाही, अशी उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.


या फुलपाखरांचा अकोल्यात वावर

कॉमन जेझेबल, कॉमन टायगर, स्ट्राइपड् टायगर, कॉमन मोरमोन, लाइन बटरफ्लाय, कॉमन लेपर्ड, येलो पॅन्सी, ब्राऊन पॅन्सी, ब्लू पॅन्सी, कॉमन रोझ, कॉमन ग्रास येलो, एमीग्रांट, कॉमन सेलर, आॅरेंज टीप, ब्लू टायगर, ग्लासी टायगर, कॉमन क्रो, जोकर, एम प्लाय, ग्राम ब्लू, स्वॉर्ड टेल, क्रीमझन टीप, कॉमन इव्हनिंग ब्राऊन, पिकॉक पॅन्सी या सर्व फुलपाखरांची मराठी नावेसुद्धा खूप सुरेख आहेत. जसे आॅरेंज टीप बटरफ्लाय म्हणजे शेंदूर टोक्या फुलपाखरू. ही फुलपाखरे प्रामुख्याने आढळतात. पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने फुलपाखरांची जुजबी ओळख करून घेता येते, त्यामुळे फुलपाखरांचे निरीक्षण करून त्याची ओळखीचा शोध घेण्याची गरज आहे.
 
फुलपाखरे ही अनेकदृष्ट्या जैवविविध कशी आहेत, ही गोष्ट दर्शवते. पर्यावरणामध्ये सशक्त जैवविविधता असेल तरच सर्व मानवजातीचे हित आहे. फुलपाखरांचे जे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते घराघरातून पटवून देण्यासाठी मनोरंजनातून ज्ञानार्जन कार्यक्रम करणे आवश्यक आहे.
- उदय वझे,
पक्षी, पर्यावरण अभ्यासक
 

प्राणी विश्वातील फुलपाखरे हा असा एकमेव जीव आहे जो मानवी मनाला विस्मयचकित करीत असतो. निसर्ग संपदेतील ही वैविधता खरे तर शालेय शिक्षणापासूनच न्याहाळल्या गेली तर त्यामध्ये खूप काही हाती गवसेल, हे निश्चित. त्या अनुषंगाने शासनाने विचार करायला हवा.
-दीपक जोशी
पक्षी मित्र
 
 

Web Title: Marathi Names to butterflies in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.