अकोट शहरात चार ठिकाणी दैनंदिन फळ व भाजीपाला बाजार भरविण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात मुख्य जवाहर रोडवर नागरिकांची व लघु व्यावसायिकांची बेफिकिरी दिसून येत आहे.
काहीजण विनाकारण जीवनावश्यक वस्तू खरेदीचे कामाच्या नावाखाली बाजारपेठेमध्ये फिरतात. घराजवळ सर्वकाही मिळत असतांना बाजारपेठ एकाच परिसरात गर्दी करत आहेत. ही गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या आदेशान्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता व उपाययोजना म्हणून मुख्याधिकारी श्रीकृष्ण वाहुरवाघ यांनी शहरात चार ठिकाणी फळ व भाजी बाजार भरवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून त्या-त्या परिसरातील लोकांना त्याच भागात फळे व भाजीपाला मिळेल म्हणून १६ एप्रिलपासून श्री स्वामी समर्थ केंद्रासमोर नगर परिषद जागा कॉलेज रोड अकोट, अकोला नाका ते खानापूर वेस, हिवरखेड रोड कलदार चौक ऩ पा़ जागेत व
रामटेक पुरा चौक या ठिकाणी तात्पुरता बाजार भरविण्यात येणार आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळ विक्रेत्यांनी बाजारपेठ मांडली होती, परंतु अनेकांनी तोंडावर कुठले प्रकारचा मास्क वापरत असल्याचे दिसून येत नाही. शिवाय अनेक व्यावसायिकांनी जोड कुठल्याही प्रकारचा सॅनिटायझरसुद्धा आढळून येत नाही. या सर्व प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अकोट तालुक्यात शेकडो रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसाला पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू होत आहे तरीसुद्धा नागरिकांच्या स्वतःच्या जिवा विषयाची बेफिकिरी दिसून येत आहे. ही बेफिकिरी शहरातील रुग्णात भर टाकण्याची भीती आहे.
---------
चौकट....
छटाकभर सांभारात..कोरोना घरात
अनेकांना बाहेर फिरण्याची हौस आहे. कोणत्याही कारण शोधत अनावश्यक फिरताना अनेकजण दिसून येत आहे. लाॅकडाऊन लागण्याच्या भीतीपोटी अनेकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी करून मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत खरेदी केली होती. त्यानंतर शासनाने भाजीपाला बाजारात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली. परंतु अनावश्यकपणे बाहेर फिरण्यावर कडक निर्बंध घातले आहेत. तरीसुद्धा अनेक जण छटाकभर सांभार (कोथिंबीर) खरेदीच्या नावाखाली बाहेर पडून नाहक गर्दी करत आहेत. स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता सांभाराच्या नावाखाली घरात कोरोना घेऊन जात असल्याचे प्रतिक्रिया उमटत आहेत.