दुष्काळामुळे बाजार मंदावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 02:43 PM2019-05-15T14:43:09+5:302019-05-15T14:43:21+5:30

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.

Market committee slowdown Due to Drought | दुष्काळामुळे बाजार मंदावला!

दुष्काळामुळे बाजार मंदावला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात पिकांची परिस्थितीसुद्धा समाधानकारक नाही. कमी पावसामुळे तूर, हरभरा, सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.
खरीप हंगामात कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके अकोला जिल्ह्यात घेतली जातात. यासोबतच, केळी, संत्रा, भुईमूग, उसाचे पीकसुद्धा घेतले जाते. रब्बी हंगामात हरभरा, गहू इतर किरकोळ पिके घेतली जातात. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास सर्व पिकांचे उत्पादन काही प्रमाणात का होईना, परंतु उत्पादनात घट झाली आहे.
जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे. यंदा पिकांना साजेसा पाऊस न झाल्यामुळे मूग, तूर, हरभºयाचे उत्पादन बºयाच प्रमाणात कमी झाले आहे. दुष्काळाची झळ जिल्ह्यातील अनेक गावांना पोहोचली असल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी हे कोरडवाहूच शेती करतात. सिंचनाची व्यवस्था असणाºया शेतकऱ्यांना मात्र उत्पादन चांगले झाले; परंतु कोरडवाहू शेतीला यंदा पावसाने दगा दिल्यामुळे उत्पादनावर त्याचा निश्चित परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून ऐकायला मिळाल्या. गतवर्षीसुद्धा दुष्काळाचा फटका जिल्ह्याला बसला होता; परंतु पीक परिस्थितीवर त्याचा एवढा परिणाम दिसून आला नाही. गतवर्षीत बाजार समित्यांमध्ये धान्याची चांगली आवक झाली होती. यंदा मात्र, तशी परिस्थिती दिसून येत नाही.
सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये ३ ते ४ क्विंटल धान्याची आवक होत असल्यामुळे हमाल, मापारी, अडते, व्यापाºयांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास बाजार समिती परिसरात शुकशुकाट दिसून येतो. दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे राज्य शासनाने सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.


यंदा पिके झाली नाहीत. सोयाबहन, तूर, हरभºयाचे पीक साधारण झाले. त्याचा परिणाम बाजार समितीमधील व्यवहारांवर दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेने यंदा शेतमालाची आवक कमी झाली आहे.
-शिरीष धोत्रे,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला


गतवर्षीच्या तुलनेत तूर, हरभºयाची आवक कमी आहे. दररोज तीन ते चार क्विंटल धान्याची आवक आहे. दुष्काळ परिस्थितीचा परिणाम जाणवत आहे. बाजार समितीतील उलाढाल कमी झाली आहे.
-सुनील मालोकार, सचिव, कृउबास, अकोला

यंदा पीकपाणी चांगले झाले नाही. तूर, सोयाबीन, मूग पिकांचे उत्पादन घटल्याने आवक कमी आहे. दुष्काळाचा फारसा परिणाम दिसून येत नाही; परंतु मालाची आवक घटली आहे.
- राजेश राठी,
अडत दुकानदार

यंदा नापिकी आहे. काही भागामध्ये दुष्काळ जाणवत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक नाही. भाव-कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी समाधानी नाही.
-विनोद हेरोळे, शेतकरी, पातूर नंदापूर

Web Title: Market committee slowdown Due to Drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.