- संजय खांडेकरअकोला: संपूर्ण देशात सरकी ढेपचा पुरवठा करणाऱ्या अकोल्यातील ढेपची बाजारपेठ गत काही दिवसांपासून मागे पडली आहे. अकोल्याच्या बाजारपेठेची जागा मराठवाड्यातील बीडने घेतल्याने अकोल्यातील सरकी आॅइल मिल्स-ढेपेच्या उद्योगांची संख्या सातत्याने कमी होत आहे.अकोला आणि परिसरात कापसाचा पेरा जास्त असल्याने या परिसरात जिनिंग प्रेसिंग, आॅइल मिल्स-सरकी ढेपचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहे. अकोल्यातील सरकी ढेप दुधाळ जनावरांसाठी लाभदायक ठरत असल्याने देशभरातून सरकी ढेपला मागणी असते. त्यामुळे अकोल्यातील ढेपची बाजारपेठ देशातील मोजक्या बाजारपेठेत गणल्या जाते. ढेपचे भावदेखील अकोल्यातील व्यापारी ठरवित असतात. ढेपचे भाव कापसाच्या आवक आणि बाजारमूल्यावरून काढले जातात. सध्या कापसाला ५,६०० प्रतिक्विंटल भाव असून, भाव अधिक वधारणार असल्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे शेतकºयांनी अद्याप कापूस बाजारात आणलेला नाही. कापसाला चांगला भाव असल्याने ढेपचे भावही वधारले आहे. १,९०० पासून तर २,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत ढेपेचे भाव आहेत. अकोल्यातील ढेपपेक्षा बीडमधील ढेप एका क्विंटल मागे शंभर-दीडशे रुपयांना स्वस्त पडत आहे. सोबतच अकोल्यापेक्षा वाहतूक खर्चही कमी पडत असल्याने बीडच्या ढेप बाजाराने अकोल्यास मागे टाकले आहे.सहा महिन्यात सहाशेने वधारली ढेपमागील सहा महिन्यात सहाशे रुपयांनी ढेपचे भाव वधारले आहे. मे-जून मध्ये ढेपचे भाव १,२०० ते १,४०० मात्र कापसाला भाव मिळताच ढेपचे भाव १,९०० ते २,००० च्या घरात पोहोचले आहे. ढेपवरील जीएसटी माफ केली असली तरी कापसावर आणि आॅइल मिल्सवर पाच टक्के जीएसटी लादल्याने त्याचा परिणाम ढेपवर अप्रत्यक्ष पडत आहे.५५ वरून १५ वर आले उद्योगपंधरा वर्षाआधी अकोला एमआयडीसीत सरकी आॅइल मिल-सरकी ढेपचे उद्योग ५५ होते; मात्र सातत्याने उद्योग बंद पडत असल्याने आता अकोल्यातील उद्योगांची संख्या केवळ १५ वर येऊन थांबली आहे. अकोल्यातील ढेपच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला आहे.