पावसामुळे पणनचे कापूस खरेदी केंद्र बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:13 PM2020-06-07T17:13:57+5:302020-06-07T17:14:04+5:30

पाऊस सुरू असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र बंद केले.

Marketing cotton purchasing center closed due to rains! | पावसामुळे पणनचे कापूस खरेदी केंद्र बंद!

पावसामुळे पणनचे कापूस खरेदी केंद्र बंद!

googlenewsNext

अकोला : मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी केंद्र बंद केले. पावसाचा अंदाज घेऊन पुन्हा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे या वर्षी कापूस खरेदीला विलंब झाला असून, हजारो शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. शेतकऱ्यांकडील सर्व कापूस खरेदी करण्यात यावा, असे शासनाचे निर्देश असल्याने पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केली. राज्यात आतापर्यंत ७२ लाख क्विंटल कापूस खरेदी केला; परंतु कापूस खरेदीची गती संथ असल्याने शेतकºयांना कापूस विक्रीस विलंब होत आहे. विक्रीस आणलेला कापूस खरेदी केला जात नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
आता तर मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने पणन महासंघाने अमरावती अकोला व इतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अंजनगाव, वरुळ आदी ठिकाणची केंद्रे बंद ठेवली आहेत.

Web Title: Marketing cotton purchasing center closed due to rains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.