लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात आगामी पंधरा दिवस ‘कोरोना’चे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वच स्तरातून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता राज्यभरातील सर्वच जिल्हा मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांकडून मास्कची निर्मिती करून घेण्यात येत आहे.राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी राज्यभरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. शिवाय, आगामी काळातील स्थिती पाहता वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मास्कचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्यंतरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृहातील कैद्यांद्वारे मास्क निर्मितीची संकल्पना मांडली होती.त्यांच्या या संकल्पनेला प्रतिसाद देत राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांद्वारे मास्क निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे.मास्क निर्मिती करताना कैद्यांकडून स्वच्छतादेखील पाळण्यात येत आहे. शिवाय, सर्वसाधारण विषाणूंचादेखील एकापासून दुसºयाला संसर्ग होऊ नये, यासाठी तेदेखील मास्क लावूनच काम करीत असल्याचे चित्र जिल्हा कारागृहात दिसून येते.‘मास्क’चा उपयोग कैदी अन् पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच! कारागृहात निर्मित मास्कचा उपयोग हा कैद्यांसह कारागृहातील पोलीस कर्मचाºयांसाठीच केला जाणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला बाहेरून मास्क विकत आणावे लागणार नाहीत.
कोरोनाचा धोका पाहता कारागृहात आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी बाहेरून येताना हात व तोंड स्वच्छ धुवूनच कारागृहात प्रवेश करीत आहेत. कैद्याकडून मास्कची निर्मितीदेखील करण्यात येत आहे. या मास्कचा उपयोग कैद्यांसह पोलीस कर्मचारी करणार आहेत.- ए. एस. सदाफुले, कारागृह अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकोला.