अकोला: अनरेग्युलेटेड डिपॉजिट स्कीम आर्डिनन्स २०१९ ला व्यापाऱ्यांनी घाबरू नये, येणाºया कायद्यातील नियमावली जाहीर होऊ द्या, जर हा कायदा व्यापाºयांच्या विरोधात जात असेल, तर ‘कॅट’तर्फे देशभरात आंदोलन छेडल्या जाईल, अशी ग्वाही कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅटचे) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी दिली. अकोल्यातील विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्समध्ये रविवारी व्यापाºयांची खुली चर्चा झाली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भरतिया बोलत होते. मंचावर राष्ट्रीय ‘कॅट’चे सचिव अशोक डालमिया, विदर्भ चेंबरचे अध्यक्ष राजकुमार बिलाला, जेम्स अॅण्ड ज्वेलरीचे पदाधिकरी नितीन खंडेलवाल, राहुल गोयनका, पूनम मॅडम व विवेक डालमिया प्रामुख्याने उपस्थित होते.व्यापारासाठी घेतलेले कर्ज किंवा नातेवाइकांकडून घेतलेली मदत अनरेग्युलेटेड डिपॉजिट स्कीम आर्डिनन्स २०१९ मध्ये येत नाही. विविध स्कीम ठेवून जे लोक रकमांच्या ठेवी ठेवून आमिष देत असतील किंवा थेट रक्कम ठेवीचा व्यापार करीत असतील, त्यांच्यासाठी हा कायदा होत आहे. अनरेग्युलेटेड डिपॉजिट स्कीमचा शब्दश: अर्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रस्तावित कायद्याची नियमावली आल्यानंतर त्यावर सुधारणेसाठी मते मागितली. जर त्यात व्यापारी विरोधी धोरण आढळले तर ‘कॅट’तर्फे आंदोलनाचे शस्त्र उपसले जाईल. व्यापाºयांनी पॅनिक होण्याची गरज नाही. त्यांनी आपला व्यापार नियमित सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.स्टार्ट अप इंडियाच्या अभिनव उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. इनेगेटिव्ह आयडिया घेऊन येणाºया या उपक्रमात व्यापाºयांनी तीन ते पाच लाख रुपयांची गुंतवणूक करावी, भविष्यात असेच उपक्रम तरतील, असेही ते म्हणाले, नवे व्यापार आणि नवीन गुंतवणुकीचे क्षेत्र समोर येत आहेत. त्याची तोंड ओळख व्यापाºयांना करून देण्याच्या दृष्टीने हे चर्चासत्र घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. केंद्राच्या आगामी ई-कॉमर्स पॉलिसीच्या कायद्यामुळे भविष्यात जागतिक बड्या कंपन्यांना कस्टम ड्युटी आणि जीएसटी भरावा लागेल. त्यामुळे ते स्वस्त दरात वस्तू विकू शकणार नाही, असेही ते याप्रसंगी बोलले. भविष्यात आॅनलाइन सर्व्हिसशिवाय उद्योग टिकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येथे उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे भरतिया यांनी दिलीत. विदर्भ चेंबरच्या सभागृहात झालेल्या या चर्चासत्रासाठी रमाकांत खेतान, विजय पनपालिया यांच्यासह अकोल्यातील अनेक उद्योजक, हुंडीचिठ्ठी दलाल, सीए आदी प्रामुख्याने उपस्थित होते.१९ मार्चला चीन उत्पादित वस्तूंची होळीदेश तणावाच्या स्थितीतून जात असताना सत्ताधाºयांसोबत राहण्याची ही वेळ आहे. सोबतच पाकिस्तानला सहकार्य करणाºया चीनलाही धडा शिकविण्याची गरज आहे. चीन उत्पादित वस्तंूवर जर भारताने बहिष्कार घातला, तर अप्रत्यक्ष पाकिस्तानला धडा शिकविला जाऊ शकतो. त्यामुळे देशभरात १९ मार्च २०१९ रोजी विदर्भ चेंबरने ठिकठिकाणी चीन उत्पादित वस्तूंची होळी करावी, असे आवाहनही त्यांनी येथे केले.