‘एमआयडीसी’ सेवा शुल्क पाचपट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 02:02 PM2019-11-24T14:02:28+5:302019-11-24T14:03:03+5:30

एमआयडीसी प्रशासनाने ३ रुपये प्रतिचौरस मीटरवरून १२, १३ आणि १५ रुपये प्रति चौ.मी. दर करण्याचा निर्णय घेतला आहे.

'MIDC' service fee increase five time | ‘एमआयडीसी’ सेवा शुल्क पाचपट!

‘एमआयडीसी’ सेवा शुल्क पाचपट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १ नोव्हेंबर २०१९ पासून सेवा शुल्क दरात पाच पटीने वाढ केली आहे. या दरवाढीविरुद्ध उद्योजकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या नियमावलीखाली उद्योजकांची लूट होत असल्याचा आरोप फेडरेशन आॅफ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी केला आहे.
एमआयडीसी प्रशासनाने ३ रुपये प्रतिचौरस मीटरवरून   १२, १३ आणि १५ रुपये प्रति चौ.मी. दर करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या तुलनेत थेट पाचपट जास्त सेवा शुल्क केल्याने रोष व्य्’ाक्त होत आहेत. ज्या ठिकाणी १ एकर प्लॉटकरिता रु. १२१५ रुपये सेवा शुल्क लागत असे त्या ठिकाणी आता ६०७० रुपये भरावे लागणार आहेत. सेवा शुल्काच्या नावाखाली एमआयडीसी प्रशासनाकडून ही रक्कम घेतली जाते; मात्र त्या तुलनेत पाहिजे तशा सेवा दिल्या जात नाहीत. पथदिवे, रस्ते, कचरा, स्वच्छता आदींबाबत अद्यापही अकोला एमआयडीसी पीछाडीवर असल्याची प्रतिक्रिया अकोला एमआयडीसी असोसिएशनचे उपाध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील पथदिवे बहुतांश वेळी बंद असतात.
मार्गांची स्थिती केविलवाणी आहे. साफसफाईच्या नावाचीदेखील बोंब आहे. पाण्याचा निचरा, त्याची विल्हेवाट लावली जात नाही. गत दोन वर्षांपासून उद्योगांमध्ये मंदीचे सावट आहे. दरम्यान डीझल, पट्रोलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. जीएसटीच्या ओझ्याखाली उद्योजक दररोज मरत आहे. ही परिस्थिती असतानादेखील सेवा शुल्कात वाढ केली जात आहे.
इतर राज्यांच्या विकासाच्या तुलनेत महाराष्ट्राला स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. शासनाने लक्ष दिले नाही तर महाराष्ट्रातील उद्योग संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. सेवा शुल्कात झालेली पाचपट दरवाढीचा विदर्भातील उदयोजकांकडून तीव्र निषेध असून, फेडरेशन आॅफ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष द्वारकादास चांडक यांनी ही दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: 'MIDC' service fee increase five time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.