मजुरांचे स्थलांतर मात्र थांबेना !

By admin | Published: October 15, 2015 12:48 AM2015-10-15T00:48:40+5:302015-10-15T00:48:40+5:30

रोहयोची ३९९ कामे सुरू ; लोणार, देऊळगावराजा तालुक्यातील मजूर कामाच्या शोधात परराज्यात.

The migration of labor only stopped! | मजुरांचे स्थलांतर मात्र थांबेना !

मजुरांचे स्थलांतर मात्र थांबेना !

Next

हर्षनंदन वाघ /बुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिसून येत आहे. काढणीच्या खर्चापेक्षा उत्पादन कमी होणार असल्याने मजुरांविना शेतीची कामे सुरू आहे. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर सुरू आहे. सदर स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची ३९९ ठिकाणी कामे सुरू असून, १९ हजार ८८९ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातून दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान मजुरांचे गुजरातसह इतर राज्यांमध्ये मजुरीसाठी मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर होते. त्यामुळे अनेक गावे ओस पडतात. स्थलांतराच्या काळातील चार ते सहा महिन्यांत परराज्यात मजुरी चांगली मिळते, शिवाय इतर बाबीही मजुरांच्या पचनी पडत असल्यामुळे स्थलांतर दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर होते. जिल्ह्यातून सर्वात जास्त लोणार, देऊळगावराजा तालुक्यातील मजूर कामानिमित्त इतर राज्यांमध्ये जात असतात. यावर्षीही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून स्थलांतराला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे स्थलांतर होऊ नये, मजुरांना स्थानिक ठिकाणीच काम उपलब्ध व्हावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ह्यमागेल त्याला कामह्ण यानुसार कामे उपलब्ध करून देण्यात येत आहेत; परंतु या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात ४६ ठिकाणी कामे सुरू आहेत. संग्रामपूर तालुक्यात २0, शेगाव तालुक्यात १३, नांदूरा तालुक्यात ५२, मलकापूर तालुक्यात ३५, मोताळा तालुक्यात ७१, खामगाव तालुक्यात १४, मेहकर तालुक्यात ३३, चिखली तालुक्यात ३५, बुलडाणा तालुक्यात १२, देऊळगाव राजा तालुक्यात २१, सिंदखेडराजा तालुक्यात २२ व लोणार तालुुुक्यात २५ ठिकाणी कामे सुरू आहेत. जिल्ह्यात रोहयोच्या कामावर जाणार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामागे मजुरी हे कारण आहे. बाहेरील राज्यात मजुरी जास्त मिळत असल्यामुळे अनेक मजुरांनी इतर व्यक्तींशी संपर्क साधून तेथे कामे मिळवली आहेत.

Web Title: The migration of labor only stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.