अकोला: केंद्र पुरस्कृत राज्यस्तरीय पशुधन विकास मंडळाचे एकाएकी नागपूरला स्थलांतरण हे अधिकाऱ्यांच्या सोईसाठी करण्यात आल्याचा आरोप करत, या निर्णयाचा डॉ. दशरथ भांडे यांनी बुधवारी तीव्र निषेध केला.अकोल्यातील पशुधन विकास मंडळ नागपूर येथे स्थलांतरीत केल्याचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानंतर रविवारी पशुधन विकास मंडळ कार्यालयाचे तडकाफडकी स्थलांतरण करण्यास सुरुवात केली होती. या संदर्भात बुधवारी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे बोलत होते. शासनापेक्षा प्रशासनाच्या मताचा सन्मान हा लाजिरवाणा असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. केंद्र सरकार पुरस्कृत राजय्स्तरीय पशुधवन विकास मंडळाचे प्रमुख कार्यालय १८ वर्षांपूर्वीच अकोल्यात स्थापन झाले. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा मानाचा तुराच आहे,. राज्यस्तरीय बियाणे महामंडळाची इमारत व पशुधन विकास मंडळाची स्थापना या दोन्ही घटना अकोलेकरांसाठी गर्वा्या आहेत. मात्र, १८ वर्षांनंतर काहीही कारण नसताना केवळ अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी पशुधन विकास मंडळाचे कार्यालय हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळी विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या जीवनात पशुधनाला महत्त्वा आहे. त्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात उत्तम देशी पशु प्रगत करुन दुग्ध उत्पादन वाढविणे हा त्या मागचा केंद्र शासनाचा हेतू होता. त्याला पश्चिम महाराष्ट्रातील काहींनी साथ दिली, परंतु राज्य मंत्री मंडळातील त्या खात्याचा मंत्री म्हणून महामंडळ अकोल्यात कसे महत्त्वाचे हे सर्वांना पटवून दिले व सर्व विरोध मोडून अकोल्यात या महामंडळाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले. अकोल्यासाठी हे महामंडळ अतिशय महत्त्वाचे असून सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाचा केवळ विरोधच नाही, तर एक जुटीने यासाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत डॉ. भांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राज्यात सध्या अनेक पक्षाचे सरकार सत्तेत आहे. सहाजिकच नाेकरशाहीची मनमानि स्वहिताचे निर्णय घेण्यास सरसावल्याचे त्यांनी२१ डिसेंबर २०१९ चा शासन निर्णय, असो की पर्यटन महोत्सवात मागील तीस वर्षांपासून समाविष्ट असलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा वगळण्याचा निर्णय असो, अशा अनेक बाबी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नसल्याचे म्हणत डॉ. भांडे यांनी या निर्णयांचा निषेध व्यक्त केला.
अधिकाऱ्यांच्या सोईसाठी पशुधन विकास मंडळाचे स्थलांतरण - दशरथ भांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 7:20 PM