रस्त्यावर पडलेला मोबाइल, पैशांचे पाकीट केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:59+5:302021-01-01T04:13:59+5:30
अकाेला : वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर सिटी काेतवाली चौकात कर्त्यव्यावर हजर असतांना त्यांना रस्त्यावर ...
अकाेला : वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर सिटी काेतवाली चौकात कर्त्यव्यावर हजर असतांना त्यांना रस्त्यावर एक मोबाइल व पाकीट पडलेले दिसले. त्यांनी सदर मोबाइल व पाकीट ताब्यात घेऊन पाकिटात शोध घेतला असता त्यामध्ये वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र व वाहन चालविण्याचा परवाना मिळून आला. त्यावरील पत्ता स्थानिक उमरी येथील असल्याने व वाहतूक कर्मचारी सुद्धा त्याच परिसरात राहत असल्याने त्यांनी शोध घेऊन सदर युवकास माेबाइल व पाकीट परत करून प्रामाणिकतेचा परिचय दिला.
सदर मोबाइल व महत्त्वाचे मूळ कागदपत्रे असलेले पाकीट उमरी येथील चंदू गवारे यांचे असल्याचे वाहतूक पाेलीस कर्मचारी गंगाखेडकर यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांचे ओळखीचे त्या परिसरात राहत असलेल्या मित्राकडून चंदू गवारे यांना माहिती दिली. महागडा मोबाइल व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट हरविल्याने गवारे शाेध घेतच हाेते. एवढ्यातच सहायक पोलीस उपनिरीक्षक नारायण गंगाखेडकर यांनी खात्री करून महागडा २० हजार रुपये किंमत असलेला मोबाइल व पाकीट परत केले. वाहतूक पाेलिसांच्या या कार्यामुळे त्यांचे काैतुक हाेत आहे.