गेल्या काही महिन्यांपूर्वी मोबाईल सेवेचे दर मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले. शिवाय दर महिन्याला एका ठरावीक रकमेचे रिचार्ज करावेच लागेल, असा नियम लागू करण्यात आला. मात्र दर वाढविल्यानंतरही मोबाईल सेवेचा दर्जा मात्र सुधारण्याऐवजी आणखी खालावला आहे. आगर विविध मोबाइल कंपन्यांचे मोबाईलधारक आहेत. त्यापैकी अनेक मोबाइल धारकांच्या चांगल्या दर्जाच्या मोबाईल हँडसेटला इंटरनेटची रेंज मिळत नाही. मिळाली तरी ती दर्जाहीन असल्याने डाउनलोडिंगमध्ये किंवा अपलोडिंगमध्ये प्रचंड अडचणी येतात. ४ जीच्या नावाने पैसे उकळणाऱ्या कंपन्यांकडून दिल्या जाणारी इंटरनेट सेवा ही २ जी पेक्षाही वाईट दर्जाची असल्याचे अनेक मोबाईलधारकांचे अनुभव आहेत. याशिवाय याशिवाय अनेक मोबाईलधारकांनी कॉल केल्यानंतर ते लागत नाहीत. लागले तर आपोआप कट होतात. बोलणे सुरू असताना मध्येच आपोआप कॉल कट झाल्याने व पुन्हा कॉल लावल्यानंतर तो लागत नसल्याने प्रचंड मनस्ताप होतो.
म्हणायला फोरजी, सेवा टूजी पेक्षाही वाईट
४ जी सेवेच्या नावाने पैसे उकडूनही २ जी पेक्षाही वाईट दर्जाची सेवा मोबाईल ग्राहकांना मिळत असल्याने मोबाईल ग्राहकांमध्ये मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या विरुद्ध प्रचंड रोष व वैताग आहे. परंतु याबाबत तक्रार कुठे करावी हे अनेकांना माहीत नाही. संबंधित मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केल्यानंतर हे कस्टमर केअरचे फोन म्हणजे त्यापेक्षाही मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे या सर्व मानसिक त्रासापासून मोबाईलधारकांची मुक्तता करण्यासाठी वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.