कजाकिस्तानातील ‘माँटेग्यू हॅरिअर’ करताहेत बोरगाव परिसरात स्वच्छंद विहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:26 AM2018-01-17T00:26:01+5:302018-01-17T01:57:22+5:30

अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजगण स्वच्छंद विहार करीत असल्याचे दिसून आले. 

'montagu harrier' in Kazakhstan, flying freely in Borgaon manju area! | कजाकिस्तानातील ‘माँटेग्यू हॅरिअर’ करताहेत बोरगाव परिसरात स्वच्छंद विहार!

कजाकिस्तानातील ‘माँटेग्यू हॅरिअर’ करताहेत बोरगाव परिसरात स्वच्छंद विहार!

googlenewsNext
ठळक मुद्देपाहुण्या पक्ष्यांचे अकोला जिल्हय़ात आगमन

राम देशपांडे
अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजगण स्वच्छंद विहार करीत असल्याचे दिसून आले. 
कजाकिस्तानात संख्येने ८७ टक्क्यांहून अधिक वास्तव्य असलेला ‘माँटेग्यू हॅरिअर’ हा घार प्रजातीतील पक्षी असून, ज्या-ज्या भागात शीतलहर असते, त्या-त्या भागात तो स्थलांतरित होत असतो. एका वेळेस ३ ते ४ हजार कि.मी.चा प्रवास करणारे हे पक्षी सध्या अकोला जिल्हय़ात आले असून, बोरगाव मंजू परिसरात स्वच्छंद विहार करीत आहेत. या पक्ष्यांचे मुख्य खाद्य हे सरडे, पाली, उंदीर व छोटे पक्षी असून, तलावाच्या काठावर किडे टिपणार्‍या लहान पक्ष्यांना तो सहज वरच्यावर उचलून आपले भक्ष्य बनवतो. सायबेरिया, नॉर्थ कजाकिस्तान, वेस्ट चायना या भागात तो आपली वंशावळ वाढवतो. शीतलहर परसरताच तो भारत, आफ्रिका व आशियाई देशात स्थलांतरित होतो. झेप घेताच २५ ते ३0 कि.मी. सहज प्रवास करून खाद्य उचलून मूळ ठिकाणी तो परत येतो. 
कजाकिस्तानातील एका विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या पक्ष्यांच्या मानेवर सॅटेलाइट टॅग्ज लावले आहेत. सोलर उर्जेच्या साहाय्याने ते चार्ज होत असल्यामुळे, ते पृथ्वीतलावर ज्या ज्या भागात जातात, त्या त्या भागातील वातावरणाची माहिती शास्त्रज्ञांना सहज कळते. तसेच प्रत्येक पक्ष्याच्या पायात रबरी रिंगद्वारे नंबर टॅग लावण्यात आले आहेत. मुख्यत्वे या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन हा त्यामागचा मूळ हेतू स्पष्ट होतो. पक्ष्यांची व हवामानातील बदलांची अचूक माहिती टिपता यावी, यासाठी या पक्ष्यांच्या मानेवरच टॅग्ज रोपण करण्यात आले असून, त्यांचा त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षतादेखील घेण्यात आलेली आहे. या सर्व बाबी सोमवारी पक्षी निरीक्षण करीत असताना प्रशांत गहले यांना दृष्टीस पडलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’च्या अवलोकनानंतर दिसून आल्या. 
 

Web Title: 'montagu harrier' in Kazakhstan, flying freely in Borgaon manju area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.