मुंबई-नागपूर विशेष गाडी (दररोज)
गाडी क्रमांक ०२१६९ डाऊन मुंबई-नागपूर विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत मुंबईहून दररोज ०२.५५ वाजता रवाना होईल आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी ०५.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०२१७० अप नागपूर-मुंबई विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दररोज २१.१० वाजता रवाना होईल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
या गाडीला देवळाली, नाशिक, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा या ठिकाणी थांबा असेल.
नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी (साप्ताहिक)
गाडी क्रमांक ०११३७ अप नागपूर-अहमदाबाद विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दर बुधवारी ०८.१५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी अहमदाबादला ००.३५ वाचता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३८ डाऊन अहमदाबाद-नागपूर विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत अहमदाबादहून दर गुरुवारी १८.३० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला १०.२५ वाजता पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव येथे थांबा असणार आहे.
नागपूर-पुणे सुपरफास्ट एसी विशेष गाडी
गाडी क्रमांक ०२११४ अप नागपूर-पुणे एसी विशेष गाडी १९ जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत नागपूरहून दर मंगळवार, शुक्रवार, रविवारी ०६.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पुणे येथे ०९.०५ वाचता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०२११३ डाऊन पुणे-नागपूर एसी विशेष गाडी २० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत पुणे येथून दर बुधवार, शनिवार, सोमवारी १७.४० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी नागपूरला ०९.१० वाचता पोहोचेल.
या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड येथे थांबा असणार आहे.