अकोला : शहराचे वैभव असलेल्या मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरु असलेल्या अभियानाला गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी शहरातील मातृशक्तीचाही हात लागला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शालेय विद्यार्थीनी, शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी, बचतगट, स्वयंसेवी संस्थांच्या महिलांनी मोर्णा नदीकाठावर येऊन श्रमदान केले.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोर्णा स्वच्छतेसाठी मातृशक्तीला आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत गुरुवारी सर्व मातृशक्ती मोर्णा स्वच्छतेसाठी गिता नगर येथील मोर्णा नदीच्या किनाºयावर पोहचली व सर्वांनी सुमारे दोन तास श्रमदान केले. मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी मातृशक्तीचे हजारो हात सरसावले. यामध्ये लहान मुलीपासून सर्र्वांनीसहभाग नोंदवला. यावेळी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पांण्डेय यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, प्रेरणा राजेश खवले, निता संजय खडसे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, ज्ञानेश्वरी अशोक अमानकर, राधा रामेश्वर पुरी, योगीता विजय लोखंडे, हर्षदा खेडकर, मनपाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. दिपाली भोसले, महिला विकास आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे , वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना मेश्राम, डॉ. अनिता विधोळसह महसुल तसेच आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी यांनी मोर्णा स्वच्छतेसाठी श्रमदान करून योगदान दिले. आजच्या मोर्णा स्वच्छता मिशन अभियानात उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर , उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी एम. एम. राठोड, तहसिलदार रामेश्वर पुरी, तहसिलदार विजय लोखंडे, औद्योगीक प्रशिक्षण केंद्र मुलींचे प्राचार्य प्रमोद भंडारे आदी उपस्थित होते.