अकोला : महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना आॅनलाइन पद्धतीद्वारे वीज देयक भरण्याची सुविधा २००५ पासून उपलब्ध करून दिली आहे. ग्राहक महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे कधीही व कुठूनही आॅनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा करता येऊ शकतो. सदर पद्धतीमध्ये वीज ग्राहक त्यांच्या वीज देयकाचा भरणा क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग व यूपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतो. या सुविधेसाठी सेवा शुल्क अत्यंत माफक आहेत. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.आॅनलाइन पद्धतीने वीज देयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पद्धतीस आरबीआयच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. आॅनलाइनने वीज देयक भरणा केल्यास ग्राहकांना त्वरित एसएमएस व भरणा पावती दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे ३० लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असून, यातून दरमहा महावितरणला आॅनलाइन वीज बिल भरणा पद्धतीद्वारे साधारणत: ६०० कोटी रुपयांची महसुलाची प्राप्ती होते. आॅनलाइन पद्धतीने वीज बिल भरणा करण्याबाबत काही अडचणी असल्यास व त्यासंदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केला असून, या ठिकाणी संपर्क केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी महावितरणचे मोबाइल अॅप व संकेतस्थळामार्फत आॅनलाइनद्वारेच वीज बिल भरावे व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.इतर राज्यांच्या तुलनेत कमी सुविधा शुल्कअशा प्रकारच्या देयक भरणा प्रणालीमध्ये मास्टर, व्हिजासारख्या संस्था क्रेडिट, डेबिट कार्ड इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत देयक अदा करण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात. या बाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत माफक व वाजवी आहेत. इतर राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत कमी आहेत.रुपये ५०० पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क नाही!महावितरणच्या ग्राहकाने क्रेडिट, डेबिट कार्ड, यूपीआयमार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये ५०० पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. तसेच नेटबँकिंगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीज देयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही. या दोन्हीही पर्यांयांसाठीच्या सुविधा शुल्काचा भरणा महावितरणमार्फत करण्यात येतो.