राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्चिम विदर्भातील (वर्हाड) अकोला येथे पहिले शैक्षणिक मल्टिस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय होणार असून, यासाठी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) योजनेंतर्गत शासनाने १५ डिसेंबर रोजी साडेचार कोटी रुपये मंजूर केले. यामुळे वर्हाडा तील पशूंवर अत्याधुनिक उपकरणाने उपचार करणे सोयीचे होईल. पश्चिम विदर्भात ७५00 चौरस किमी क्षेत्रात पूर्णा नदी विस्तारली असून, या नदीच्या क्षेत्रा तील चार हजार चौरस किमीवरील ८९४ गावे खारपाणपट्टय़ात मोडतात. खारपाणपट्टय़ा तील पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असल्याने पशू आणि पक्ष्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा अभ्यास अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी केला आहे. इतरही गंभीर स्वरू पाचे आजार पशुधनावर होत असल्याने त्यांच्यावर योग्य उपचार होण्यासाठी येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे प्रकल्प प्रमुख डॉ. सुनील वाघमारे यांनी शासनाकडे रुग्णालयासाठीचा प्रकल्प सादर केला होता. त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या २३ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पास मंजुरी प्रदान करण्यात आली, तर १५ डिसेंबर रोजी साडेचार कोटी रुपये खर्चास वित्तीय मंजुरात देण्यात आली.महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठांतर्गत अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे हे रुग्णालय होणार असून, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल एक्सरे, एन्डोस्कोपी, लॅप्रोस्कोपी सर्जरी, बधिरीकरण उपकरण, झटपट रक्त, मलमूत्र तपासणी उ पकरणे रुग्णालयात बसवली जाणार आहेत. त्यावर ३ कोटी २६ लाख रुपये खर्च केले जातील. पशूला उचलण्यासाठी स्वयंचलित यंत्र लावण्यात येणार आहे. रुग्णालयाचे बांधकाम, नू तणीकरणावर उर्वरित खर्च केला जाईल.
प्रशिक्षणाची सोय शैक्षणिक मल्टिस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयात जिल्हा, तालुका स्तरावरील पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन अधिकार्यांना अद्ययावतीकरणावर प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठीची व्यवस्था केली जाणार आहे.
अस्तित्वात असलेल्या रू ग्णालयाचे बळकटीकरण करण्यात येणार असून, मल्टिस् पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयात रू पांतर करण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम विदर्भा तील पशूंवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करणे सोपे होईल. अनेक दुर्धर आजारांवर निदान करू न उपचार केले जातील.- डॉ. हेमंत बिराडे, सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.