मनपा आयुक्त रस्त्यावर; मुख्य बाजाराची केली पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:32 PM2019-07-19T12:32:53+5:302019-07-19T12:33:18+5:30

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जुना भाजी बाजार, गांधी चौकासह मुख्य बाजाराची पाहणी करीत रस्त्यावर अतिक्रमण थाटणाºया व्यावसायिक, दुकानदारांना सज्जड इशारा दिला.

 Municipal Commissioner on the road; The main market is inspected! | मनपा आयुक्त रस्त्यावर; मुख्य बाजाराची केली पाहणी!

मनपा आयुक्त रस्त्यावर; मुख्य बाजाराची केली पाहणी!

Next


अकोला: शहराच्या मुख्य बाजारातील व्यावसायिक, दुकानदारांनी थेट रस्त्यावरच बाजार थाटल्याने सर्वसामान्य नागरिकांना बाजारात धक्के खात जावे लागते. धड पायी चालण्यासाठी जागा नसल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अनेकदा महिलांची छेडखानीही होते. या प्रकारामुळे अक ोलेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही बाब लक्षात घेता गुरुवारी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जुना भाजी बाजार, गांधी चौकासह मुख्य बाजाराची पाहणी करीत रस्त्यावर अतिक्रमण थाटणाºया व्यावसायिक, दुकानदारांना सज्जड इशारा दिला. तसेच उद्यापासून या परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले.
शहरातील मुख्य बाजारपेठ व परिसराला लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. मनपाच्या अतिक्र मण निर्मूलन पथकाचा धाक नसल्यामुळे फेरीवाले चक्क मुख्य रस्त्यांवर बाजार मांडतात. यामध्ये प्रामुख्याने रेडीमेड ड्रेस विक्रेते, खाद्यपदार्थांची विक्री करणारे तसेच फळ विके्रत्यांचा समावेश आहे. शहराची संपूर्ण बाजारपेठ गांधी रोड, टिळक रोड, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉजपर्यंतच्या मार्गावर स्थिरावली आहे. अतिक्रमकांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्यावर धड पायी चालणे मुश्कील झाले आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनासह सत्ताधाºयांकडे प्रचंड तक्रारी होत असल्या तरी त्यावर ठोस अंमलबजावणी होत नसल्याची परिस्थिती आहे. अतिक्रमणाच्या मुद्यावरून अकोलेकरांमध्ये मनपा प्रशासनाप्रती तीव्र नाराजी पसरली आहे. ही बाब ध्यानात घेता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी गुरुवारी जुना भाजी बाजार, कोठडी बाजार, दाणा बाजार, किराणा मार्केट, मटका बाजार, गांधी चौक, गांधी चौकातील चौपाटी आदी ठिकाणची प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी रस्त्यावर साहित्य ठेवणाºया व्यावसायिकांना व दुकानदारांना पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.


कारवाईला प्रारंभ करा!
आयुक्त संजय कापडणीस यांनी मुख्य बाजाराची पाहणी केल्यानंतर अनेक दुकानदार, व्यावसायिकांनी त्यांचे टिनाचे शेड, ओटे, पायºया रस्त्यावर बांधल्याचे निदर्शनास आले. गांधी चौपाटीवर हीच परिस्थिती आढळून आली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून आयुक्तांनी शुक्रवारपासून अतिक्रमण काढण्याचे निर्देश अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले.

फेरीवाला संघाच्या पदाधिकाऱ्यांना निर्देश
मनपाने लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांना शहरात २१ ठिकाणी हॉकर्स झोन उपलब्ध करून दिले आहेत. सदर जागेवरच लघू व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करावा, या मुद्यावर आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात सर्वधर्मसमभाव फुटपाथ व फेरी विक्रेता संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही रस्त्यावर व्यवसाय थाटल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

 

Web Title:  Municipal Commissioner on the road; The main market is inspected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.